Future of Agriculture Agrowon
टेक्नोवन

Future of Agriculture: भविष्यातील शेती कशी असेल?

मी तुम्हाला थोडे यंत्रयुगाविषयी सांगतो. पहिल्या यंत्रयुगाला खरी सुरूवात जागतिक औद्योगिक क्रांतीपासून वाफेच्या इंजिनपासूनच झालेली आहे. पहिल्या यंत्रयुगात मानवी श्रमाला वाढवून जास्तीत जास्त ताकद निर्माण करण्यासाठी शोध लावले जात होते.

Team Agrowon

- नानासाहेब पाटील

भविष्यातील शेतीच्या आधी संशोधकांना भविष्य म्हणजे फ्युचर (Future) या संकल्पनेविषयी काय वाटते ते आधी सांगतो. शास्त्रज्ञ (Scientist) असे म्हणतात की," माणूस आपल्या भविष्याविषयी सर्व काही माहित करून घेवू शकत नाही.

पण, तुम्ही जर तंत्रज्ञान (Technology) समजून घेतले तर भविष्याविषयी तुम्हाला बरीच माहिती मिळते. कारण, तंत्रज्ञानच आपले भविष्य घडवित असते.

" भविष्य जाणून घेण्यासाठी संयम लागतो आणि तो विद्मवतेत असतो. संयम आणि विद्वता पररस्परपुरक आहे. संयम म्हणजे नुसचा वेगाचा अभाव नव्हे तर तेथे विचार आणि त्याचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी भरपूर जागा असणे असे देखील म्हणता येते.

विचारांमधूनच ज्ञान व माहितीचा उगम होतो. आणि चांगले ज्ञान तेच की जे कोणालाही कृतीत आणता येते. 

मी ही विचारधारा यासाठी सांगतोय की शेतीमधील आर्टिफिशियल इन्टेलिजन्ट आणि रोबोट प्रणालीच्या अभ्यासाचा गाभा या विचारांमध्येच आहे.

भविष्यातील शेतीत मजुरांऐवजी उडया मारणारे रोबोट दिसतील. ते नांगरणी,वखरणी, खुरपणी, फवारणी हीच कामे नव्हे तर नुसता पानांचा अभ्यास करून कीडरोग किंवा अन्नद्रव्याची कमतरता ओळखून त्यानुसार फवारणी करतील किंवा फर्टिगेशनचे निर्णय घेतील. 

कोणत्या झाडाला किती पाणी द्यावे लागेल, कीडरोग नियंत्रणासाठी फवारणी कुठे, कधी करावी याची निर्णय शेतकरी नव्हे तर रोबोटस घेतील. जमीन तयार करून बी पेरण्यापासून ते पुढे कापणी, मळणी करून पोते लोड करण्यापर्यंत सर्व कामे रोबोटस करतील. 

मी हे जे सांगतोय ते स्वप्न किंवा काल्पनिक नाही. हे घडतेय जगात. रोप न तोडता वावरात उडया मारणारा स्कॅम्प रोबोट काम करतो आहे. सेन्सर बसविलेली एपीआय बग्गी म्हणजे अॅटोनॉमस प्लॅन्ट इन्सपेक्शन प्रणाली असलेली बग्गी शेतात सोडून रोपांना धक्का न लावता तण, माती, पाने यांची तपासणी करणारी यंत्रणा डेन्मार्कमध्ये काम करते आहे.

स्ट्रॉबेरी, द्राक्षे, सफरचंदांच्या बागांमध्ये स्वतःहून फळ तोडणी करणारे रोबोट विदेशात आलेले आहेत. त्यामुळे भारतीय शेती देखील आर्टिफिशियल इन्टेलिजन्ट आणि रोबोटच्या उंबरठयावर पोहोचलेली आहेच.

यंत्र व तंत्रज्ञानाचा विकास
मानव जातीच्या अलिकडच्या काही शतकांच्या प्रगतीचा इतिहास तुम्ही अभ्यासाल तर तो यंत्र आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचाच इतिहास आहे. यंत्र-तंत्रज्ञानाची प्रगती उपयुक्तच असते. तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर ही उपयुक्तता अवलंबून आहे. 

मी तुम्हाला थोडे यंत्रयुगाविषयी सांगतो.  पहिल्या यंत्रयुगाला खरी सुरूवात जागतिक औद्योगिक क्रांतीपासून वाफेच्या इंजिनपासूनच झालेली आहे. पहिल्या यंत्रयुगात मानवी श्रमाला वाढवून जास्तीत जास्त ताकद निर्माण करण्यासाठी शोध लावले जात होते.

तेथे मात्र यंत्रविषयक निर्णय घेण्यासाठी मानवाची गरज होती. त्यामुळेच तेथे मानवी नियंत्रण होते आणि श्रमाला किंमत होती. 

श्रम व यंत्रे एकमेकांना पुरक होती. 

आता दुस-या यंत्रयुगात पूर्णतः कृत्रिम बुध्दिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हातात चाव्या गेल्या असून तो मानवापेक्षाही बुध्दिमान आहे. त्यामुळे मानवाकडून किंवा सॉफ्टवेअरकडून चालविणारी दुस-या यंत्रयुगातील मशीन्स ही मानवाला परस्परपुरक नव्हे तर पर्याय म्हणून उभी राहिली आहेत.

आता संगणकीय ताकद इतकी अफाट वेगाने वाढली आहे की सर्वत्र बदल तर होतच आहेत पण बदलात देखील बदल होत. या बदलांच्या बरोबरीने वाटचाल करण्याचा किंवा स्विकारण्याचा मानवी समुहाचा वेग कमी होतो आहे.

म्हणजेच शेतक-याच्या हातात एक नवीन फोन हाती पडल्यावर त्याचे फंक्शन शिकणे नव्हे तर माहित होण्याच्या आधीच काही महिन्यात मोबाईलचे दुसरे व्हर्जन येते आहे. 

संगणकाची मुळ चीप आता बारीक होत असून त्यातील डेटा साठवण्याची क्षमता इतकी अफाट पध्दतीने वाढत असल्यामुळे संगणकीय विश्लेषण शक्तीला अफाट ताकद मिळते आहे. यामुळे शास्त्रज्ञ इरिक टेलर म्हणतो आहे की तज्ञांना देखील आज हे सांगता येत नाही की पुढील जग काय असेल. अशा स्थितीत नाही. 

2007 मध्ये आयफोन आल्यामुळे संगणक, मिडिया प्लेअर आणि कम्युनिकेशन प्रत्येकाच्या हातात आले. याच काळात अफाट डेटा साठवण क्षमता असलेल्या हडुप कंपनीचा उगम झाला. फेसबुक, ट्विटर आले. मोबाईलाचा झपाटयाने विकास झाला. यामुळे मानवी समुहाचे नागरी जातीत (अर्बन स्पिशिज) मध्ये रुपांतर झाले. 

तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला ते तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एका मानवी जिनोम शृंखलेच्या निर्मितीला 2001 मध्ये 100 दशलक्ष डॉलर्स खर्च येत होतो.  केवळ संगणकीय अफाट क्षमतेमुळे 2015 मध्ये अवघ्या 1000 डॉलर्समध्ये जनुकीय शृंखला तयार करून मिळू लागली.  डिजिटल रिव्ह्युल्युशनने मानवी भविष्याचा पाया रचला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT