Drone Agrowon
टेक्नोवन

सरकार देणार 'ड्रोन'साठी पाच लाखांपर्यंत अनुदान

ड्रोनसाठी सध्या केवळ कृषी संबंधित सरकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी विद्यापीठांना अनुदान मिळू शकते. सध्याच्या ड्रोन धोरणात वैयक्तिक शेतकऱ्याला अनुदान देण्याची तरतूद नव्हती.

Team Agrowon

ड्रोनसाठी सध्या केवळ कृषी संबंधित सरकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी विद्यापीठांना अनुदान मिळू शकते. सध्याच्या ड्रोन धोरणात वैयक्तिक शेतकऱ्याला अनुदान देण्याची तरतूद नव्हती.

मात्र ही अडचण आता हटविण्यात आली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव शोमिता बिश्‍वास यांनी जारी केलेल्या एका आदेशानुसार वैयक्तिक शेतकरी आता ड्रोन अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.

केंद्रीय कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून ‘किसान ड्रोन’ विकत घेता येतील. दहा लाखांचा ड्रोन विकत घेतल्यास राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना ७५ टक्क्यांपर्यंत तर केव्हीके, कृषी विद्यापीठे व आयसीएआरच्या केंद्रांना १०० टक्के अनुदान देण्याची तरतूद यापूर्वीच केली गेली आहे.

नजीकच्या काळात शेतकऱ्यांच्या घरासमोर ट्रॅक्टरप्रमाणेच ड्रोनदेखील दिसू लागतील. कारण राज्याच्या कृषी विभागाने ड्रोनसाठी एक आराखडा तयार केला आहे. तो मंजूर होताच ड्रोनकरिता चालू वर्षात राज्यभर एकूण २० कोटी रुपयांपर्यंत अनुदान वाटले जाण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Organic Gardening : शाळेच्या परसबागेतून ७२५ रुपयांचे उत्पन्न

Farmer Crisis : शेतकरी अडचणीत, तातडीने आर्थिक मदत करा : रोहित पवार

Sugarcane Rate : हुतात्मा कारखान्याने ३८५० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Rajarambapu Milk Union : राजारामबापू दूध संघाचा मराठवाड्यात विस्तार

SCROLL FOR NEXT