Soil Test Agrowon
टेक्नोवन

Soil Testing : जमीन सुपिकतेसाठी माती परिक्षण आवश्यक

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी योग्य खतांची निवड आणि शिफारशीत मात्रेत वापर अत्यंत आवश्यक असतो. त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असल्याचे कृषिदूतांकडून सांगण्यात आले.

टीम ॲग्रोवन

नाशिक ः निफाड तालुक्यातील दावसवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (Mahatma Phule Agriculture University, Rahuri) संलग्न के.के.वाघ कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी (Krushidoot) ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिकता कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे (Soil Test) महत्त्व पटवून दिले.

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी योग्य खतांची निवड आणि शिफारशीत मात्रेत वापर अत्यंत आवश्यक असतो. त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असल्याचे कृषिदूतांकडून सांगण्यात आले. यावेळी योग्य पद्धतीने मातीचा नमुना कसा घ्यावा हे प्रात्याक्षिकातून दाखविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली.

कृषिदूत अक्षय निकम, सुमित चिंचोले, अनुराग भदाणे,आदित्य गटकळ, सुशांत गडवजे, अभिराज जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत माहिती दिली. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. सतिशकुमार हाडोळे, संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के.एस.बंदी व कॅम्पस समन्वयक डॉ.व्ही .एम.सेवलीकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक परमेश्वरी पवार, गुळवणे, बैरागी, तुषार उगले यांचे मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

Marigold Farming: तीन हंगामांत झेंडूचे हुशारीने नियोजन

Agriculture Success Story: कुक्कुटपालन पूरक नव्हे, झाला मुख्य व्यवसाय

Sugarcane Farmer Issues: कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा

India Sugar Crisis: आकडे आणि नामुष्की

SCROLL FOR NEXT