DSR Technique Agrowon
टेक्नोवन

DSR Technique for Farmers: डीएसआर तंत्राने भात लागवड योजनेस पुन्हा मुदतवाढ

पंजाबच्या कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना भातलागवडीसाठी डीएसआर (DSR) तंत्राचा वापर करण्याचे आवाहन केलेले आहे. या तंत्राचा वापर करून भातलागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी १५०० रुपयांचे अनुदानही देण्यात येत आहे.

Team Agrowon

पंजाबच्या कृषी विभागाने डीएसआर तंत्राने (DSR Technique) भात लागवड करण्याच्या योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. नव्या निर्णयानुसार शेतकरी ४ जुलैपर्यंत डीएसआर तंत्राने भातलागवड करू शकणार आहेत. कृषी विभागाने यापूर्वी एकदा या योजनेला मुदतवाढ दिली होती.

पंजाबच्या कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना भातलागवडीसाठी डीएसआर (DSR) तंत्राचा वापर करण्याचे आवाहन केलेले आहे. या तंत्राचा वापर करून भातलागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी १५०० रुपयांचे अनुदानही देण्यात येत आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagvant Mann)यांनी ही घोषणा केली होती. त्यासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली.

भात लागवडीच्या (Paddy Cultivation) पारंपरिक पद्धतीत आधी रोपवाटीका तयार केली जाते. २५ ते ३० दिवसांनंतर रोपांची लागवडीयोग्य वाढ होते. त्यानंतर ही रोपे नर्सरितून काढून चिखलणी केलेल्या शेतात लावली जातात. या पद्धतीत नर्सरिपासून ते लागवडीपर्यंत पाणी जास्त लागते. तसेच या प्रक्रियेत मजुरीसाठी खर्चही वाढतो. मात्र थेट बियाणे पेरणी (डीएसआर) केल्यास शेतकऱ्यांचा एकरी ६ हजार रुपये खर्च वाचतो. ३० टक्के पाण्याची बचत होते.

पीक पालटा अभावी अथवा तीच-तीच पिके घेतल्यामुळे राज्यातील भूजलपातळी खालावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता डीएसआर (DSR Technique) तंत्राचा अवलंब करावा, असा आग्रह कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. राज्यातील १२ लाख हेक्टर क्षेत्रात डीएसआर तंत्राने भातलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

एकरी १५ हजारांचे अनुदान देण्याची योजना जाहीर करूनही आतापर्यंत केवळ ७७ हजार हेक्टर क्षेत्रात डीएसआर तंत्राने (DSR Technique) भात लागवड करण्यात आली. योजनेच्या सुरुवातीला अंतिम मुदत ३१ मेपर्यंत असेल, असे सांगण्यात आले होते.

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाताची पारंपरिक लागवड (Paddy Cultivation)बंद करून डीएसआर तंत्राचा अंगीकार करावा म्हणून योजनेला ३० जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. एकदा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांना योजनेला फारसा सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आणखी मुदतवाढ देण्यात आली. ४ जुलैपर्यंत डीएसआर तंत्रांचा वापर करून एकरी १५ हजारांचे अनुदान मिळवता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT