PAU Smart Seeder Agrowon
टेक्नोवन

पंजाब कृषी विद्यापीठाकडून स्मार्ट सीडरची निर्मिती

या अत्याधुनिक पेरणी यंत्रामुळे (PAU Smart Seeder) शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या भातपिक अवशेषांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागू शकेल. या यंत्रात सुपर सिडर आणि हॅप्पी सिडर तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

Team Agrowon

पंजाब कृषी विद्यापीठाने होशियारपूर स्टीलसोबत नुकतेच एक सहकार्य करार केला आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने एक अत्याधुनिक असे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र (PAU Smart Seeder) विकसित केले आहे. या पेरणी यंत्रासंदर्भात विद्यापीठाने जालंधर येथील होशियारपूर स्टीलसोबत हा सहकार्य करार केला आहे.

पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजमेर सिंग धाट, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाते डॉ.अशोक कुमार, विद्यापीठाच्या कृषी यांत्रिकीकरण आणि जैवऊर्जा विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. गुरुसाहिब सिंग मानेस यांनी या संशोधनाबद्दल डॉ. राजेश गोयल, डॉ. मनप्रीत सिंग यांचे अभिनंदन केले आहे.

या अत्याधुनिक पेरणी यंत्रामुळे (PAU Smart Seeder) शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या भातपिक अवशेषांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागू शकेल. या यंत्रात सुपर सिडर आणि हॅप्पी सिडर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना अवशेषांचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल, असा विश्वास विद्यापीठाच्या कृषी सयंत्रे आणि ऊर्जा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. महेश कुमार नारंग यांनी व्यक्त केला आहे.

ट्रॅक्टरच्या मदतीने वापरण्यात येणाऱ्या या पेरणी यंत्राद्वारे बियाणे जमिनीत अचूक ठिकाणी सोडणे सहजशक्य होणार आहे. ४५ ते ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे या यंत्राचा वापर करता येतो. एका तासाला ०.४ हेक्टर जमीन पेरण्याची आणि एका लिटर इंधनात ५ एकर जमीन पेरण्याची या यंत्राची क्षमता आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

विद्यापीठाने आजवर आपल्या विविध संशोधनासाठी २८९ संस्था, कंपन्यांसोबत असे सहकार्य करार केले असल्याचे माहिती पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाच्या विपणन संचालक डॉ. उषा नारा यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT