Agriculture equipment Agrowon
टेक्नोवन

भारतातील प्रथम शेती अवजाराचे ‘ग्रीन सिस्टिम’ शोरूम बार्शीत सुरू

या उद्‌घाटनाच्या निमित्ताने ५४०५ या ६३ एच.पी. ट्रॅक्टरचे जॉन डिअरचे (John Deere) सर्वात जुने ग्राहक कल्याण फरतडे यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले.

Team Agrowon

सोलापूरः मधुबन ट्रॅक्टर्स बार्शी येथे जॉन डिअर कंपनीचे ग्रीन सिस्टम हे स्वतंत्र शेती उपयोगी अवजार व उपकरण बनवणाऱ्या शोरूमचे उद्‌घाटन जॉन डिअर इंडिया प्रायव्हेट (John Deere India) लिमिटेडचे झोनल बिझनेस मॅनेजर राजेश लिंगमपल्ली यांच्या हस्ते झाले.

या वेळी व्यासपीठावर जॉन डिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रॉडक्शन सिस्टम जनरल मॅनेजर संदीप अवसरे, एरिया मॅनेजर एम.एच.-२ अंकित सक्सेना, एरिया बिझनेस मॅनेजर जॉन डिअर फायनान्स राकेश कुमार, मॅनेजर सेल्स अॅण्ड मार्केटिंग सोमनाथ कोकरे, असिस्टंट एरिया मॅनेजर कैलास तासकर, टेरिटरी कस्टमर सपोर्ट राजेश पाटील, स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नॅशनल सेल्स मॅनेजर संजय वशिष्ठ, रिजनल मॅनेजर मनू चिंतन, टेरिटरी सेल्स मॅनेजर भूषण पाटील, डॉ. नवनाथ कसपटे, मधुबन ट्रॅक्टरचे चेअरमन प्रवीण कसपटे, प्रमुख व्यवस्थापक माणिक हजारे, ॲड. विक्रम सावळे, कृषी सहायक गणेश पाटील, उद्योजक अतुल सोनीग्रा, इंडसइंड बँकेचे झोनल मॅनेजर प्रमोद यादव, लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष अमित कटारिया, शेती मित्राचे संपादक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

अंकित सक्सेना यांनी महाराष्ट्रमध्ये मधुबन ट्रॅक्टर्स डीलरशिप सर्वांत मोठी असून कंपनी नेहमी चांगल्या उपक्रमासाठी आपल्या पाठीशी असेल, असे आश्‍वासन दिले. या उद्‌घाटनाच्या निमित्ताने ५४०५ या ६३ एच.पी. ट्रॅक्टरचे जॉन डिअरचे सर्वात जुने ग्राहक कल्याण फरतडे यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माणिक हजारे यांनी केले. कार्यक्रमासाठी मधुबन ट्रॅक्टर्सच्या सर्व टीमने परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन नरेश ठाकूर यांनी केले. तर मधुबन ट्रॅक्टरचे चेअरमन प्रवीण कसपटे यांनी आभार मानले. या उद्‌घाटनाच्या निमित्ताने नवीन २२ ग्राहकांना जॉन डिअर ट्रॅक्टरची चावी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. तसेच ग्रीन सिस्टमचे तीन अवजार नवीन ग्राहकांनी खरेदी केले व स्टील कंपनीचे एक अवजार ग्राहकांनी खरेदी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT