Genome Editing In Crops Agrowon
टेक्नोवन

Genome Editing : ‘जनुकीय संपादन’ तंत्रज्ञान २३ पिकांत वापरणार

Agriculture Research : जनुकीय संपादन (जिनोम एडिटिंग) तंत्रज्ञानाला भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : जनुकीय संपादन (जिनोम एडिटिंग) तंत्रज्ञानाला भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. येत्या काळात देशातील प्रमुक पीक असलेल्या कापसासह तब्बल २३ पिकांसाठी जनुकीय संपादन हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यासाठी तब्बल ३२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे,’’ अशी माहिती ‘आयसीएआर’चे उपमहासंचालक डॉ. तिलकराज शर्मा यांनी दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे आयोजित अखिल भारतीय कापूस कार्यशाळेसाठी नागपूर दौऱ्यावर आलेल्या डॉ. शर्मा यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. डॉ. शर्मा म्हणाले, ‘‘जिनोम म्हणजे सजीवांच्या गुणसूत्रांवरील सर्व जनुकांची संरचना. त्यांचे स्थान, क्रम, कार्य, प्रकार, जाळे व विकृती याची सर्व माहिती देणारा आराखडा म्हणजे जिनोम होय. त्याला सजीवांची जनुकीय कुंडली असेही म्हटले जाते.

(ॲग्रो विशेष)

माणसांमध्ये अनेक रोगांना कारणीभूत असतात ती त्यांची जनुके म्हणजे डीएनए. जनुकीय संपादनात शास्त्रज्ञ हे अनेक सजीवांचे जनुके बदलू शकतात. त्यात वनस्पती आणि प्राण्यांचाही समावेश होतो. हे तंत्रज्ञान कात्रीसारखे काम करते. विशिष्ट जागेवर डीएनए कापले जातात.

संशोधक एखाद्या जनुकामधील एखादा तुकडा काढून टाकतात किंवा त्या ठिकाणी दुसरा तुकडा बसवतात किंवा डीएनए जिथे कापला तिथे बदल करतात. यामुळे पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविता येते. तसेच इतरही अनेक परिणाम वनस्पती पीकशास्त्रात साधणे शक्‍य होणार आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था २३ पिकांत जनुकीय संपादन करणार असून, देशभरात २५ संशोधन संस्थांच्या माध्यमातून हे काम होईल.’’

कापूस पिकाचा समावेश

‘‘कापूस पिकाखाली देशात १३० लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यामुळे कापूस पिकाचा देखील जनुकीय संपादन संशोधनात समावेश केला आहे. त्यासाठी ५ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. देशभरात ९५ टक्‍के कापूस वाण हे खासगी संस्थांचे वापरले जातात. संशोधन संस्थांच्या बियाणे वापराचे प्रमाण केवळ पाच टक्‍के आहे. त्यामुळे हे विरोधाभासी चित्र बदलण्याची गरज आहे,’’ असे मत डॉ. शर्मा यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यापासून आजवर देशात सुमारे सहा हजार वाण विकसित करण्यात आले. सद्यःस्थितीत वातावरण बदलाचे मोठे आव्हान संशोधन संस्थांसमोर आहे. त्यानुरूप संशोधनाची दिशा निश्‍चित केली आहे. एकूण विकसित बियाणे वाणांपैकी आजपर्यंत सुमारे ५० टक्‍के वाण हे वातावरण बदलाला पूरक ठरतील, असे विकसित केले आहेत.
- डॉ. तिलकराज शर्मा, उपमहासंचालक (बियाणे), भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्ली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT