Agriculture Drone Agrowon
टेक्नोवन

Drone : शेतीक्षेत्रात ड्रोन वापर कार्यपद्धती निश्‍चितीसाठी राष्ट्रीय समिती स्थापन

या समितीत देशातील तज्ज्ञ मंडळीचा समावेश आहे. त्यात नवी दिल्‍ली येथील कृषी मंत्रालयातील उपायुक्‍त इं‍जि. एस. आर. लोही हे सदस्‍य सचिव आहेत.

टीम ॲग्रोवन

परभणी ः शेती क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या (Drone Technology In Agriculture) वापराबाबत राष्‍ट्रीय पातळीवर मानक कार्यपद्धती (एसओपी) (Standard Operating Procedure For Drone) निश्‍चित करण्‍यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागांतर्गत उच्‍चस्‍तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्‍यक्षपदी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

या समितीत देशातील तज्ज्ञ मंडळीचा समावेश आहे. त्यात नवी दिल्‍ली येथील कृषी मंत्रालयातील उपायुक्‍त इं‍जि. एस. आर. लोही हे सदस्‍य सचिव आहेत. सदस्यांमध्ये पीक संरक्षण विभागाच्‍या डॉ. अर्चना सिन्‍हा, आयसीएआरचे डॉ. आर. एन. साहू, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. सुनील गोरंटीवार, गुंटुर येथील डॉ. ए. सामभाय, ‘आयएआरआय’चे डॉ. दिलीप कुशावाह, कोइमतूर येथील डॉ. एस. पाझानिवेलन, हैदराबाद येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. रामगोपाल वर्मा आदींची समावेश आहे.

डॉ. इंद्र मणी यांचा कृषी ड्रोनबाबत मोठा अभ्यास आहे. त्याचा राष्‍ट्रीय धोरण ठरविण्‍यासाठी लाभ होणार आहे. ही समिती शेतीतील निविष्‍ठा व तंत्रज्ञानाचा सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रभावी वापर यावर अभ्‍यास करून मानक कार्य पद्धती (एसओपी) निश्‍चित करेल. ड्रोनद्वारे फवारणीसाठी पीकनिहाय कीटकनाशकांच्या वापरासाठी मानक कार्य पद्धतीचा (एसओपी) मसुदा तयार करून ३० सप्‍टेंबर पर्यंत केंद्रीय कृषी मंत्रालयास सादर करणार आहे. शेती क्षेत्रात ड्रोन वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्‍सुकता आहे. भविष्‍यात कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर निश्‍चितच फायदेशीर ठरणार आहे. तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीकविमा भरपाई निश्‍चित करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

July Rainfall: जुलै महिन्यातही पाऊस कमीच

Shaktipeeth Highway Alignment: शेतकऱ्यांचा विरोध, शक्तिपीठ महामार्गाच्या ८ जिल्ह्यांतील आखणीत बदल, सरकारचा दावा

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस

Soybean Sowing: यंदा सोयाबीन क्षेत्र वाढण्याचा अंदाज; जळगावची आघाडी

Kharif Sowing Update: खानदेशात ६० टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण

SCROLL FOR NEXT