Agriculture App Agrowon
टेक्नोवन

APMC App : गंगापूर बाजार समितीने तयार केले डिजिटल अॅप

पांरपरिक व्यवस्थेतून बाहेर पडत गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पन्नास वर्षांनंतर डिजिटल झाली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव समजण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी मोबाईल ॲप विकसित केले आहे.

टीम ॲग्रोवन

गंगापूर, जि. औरंगाबाद : पांरपरिक व्यवस्थेतून बाहेर पडत गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Gangapur APMC) पन्नास वर्षांनंतर डिजिटल झाली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव (Agriculture Produce Rate) समजण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी मोबाईल ॲप (Gangapur APMC Mobile App) विकसित केले आहे. तसे करणारी बहुधा जिल्ह्यातील पहिलीच बाजार समिती असावी. मुख्य प्रशासक ऋषिकेश पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, संपूर्ण व्यवहारच संगणकीकृत झाला आहे.

गंगापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील १८३ गावांचा समावेश आहे. १० हजारांवर शेतकऱ्यांनी बाजार समितीचे ॲप मोबाईलमध्ये घेतले आहे. या ॲपमुळे संगणकीकरणामध्ये प्रत्येक वाहनांमधील शेतीमालाची प्रवेशद्वारावर संगणकीकृत नोंद होत आहे. खुल्या पद्धतीचा लिलाव होऊन प्रत्येक शेतीमालाचे डाग कोणत्या अडत्याच्या गाळ्यावर आले आहेत, याची नोंद होऊन त्याचा संदेश मोबाईलवर पाठविण्यात येत आहे.

तसेच शेतीमालाची विक्री झाल्यावर जावक गेटवरच त्याची नोंद होऊन, बाजारशुल्क (सेस) ग्राहकांकडून प्रवेशशुल्कांची आकारणी केली जात आहे. यामुळे वर्षाच्‍या शेवटी होणारी बाजार शुल्काची रक्कम दररोज बाजार समितीला मिळत आहे. तसेच प्रत्येक शेतीमालाचे दर तासाला किती दराने विक्री होत आहे. याचे दर बाजार समितीच्या वेबसाइटवर लाइव्ह दिसत आहेत. यामुळे राज्य आणि देशपातळीवर शेतकऱ्यांना शेअर बाजाराप्रमाणे प्रत्येक शेतीमालाच्या दरातील चढ-उतार कळत आहेत. याचा फायदा शेतकरी, अडते, खरेदीदार, व्यापारी आणि बाजार समितीला होत आहे.

ॲपमुळे शेअर मार्केट प्रमाणेच शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव समजतात. ॲप शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे शेतीमालाचा बांध ते ग्राहक असा प्रवास संगणकीकृत झाला आहे. या माध्यमातूनच लिलावाची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक पारदर्शी सेवा मिळत आहे. सर्व घटकांच्या समन्वयाने आणि विश्‍वासात घेऊन हे केले आहे.
ऋषिकेश पाटील मुख्य प्रशासक, गंगापूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT