cleaning and Grading Machine Agrowon
टेक्नोवन

cleaning and Grading Machine : धान्याची सफाई व प्रतवारी करा या यंत्राने

काढणीनंतर तुर, मूग, उडीद व इतर कडधान्यामध्ये काडी, कचरा, माती, अपरिपक्व दाणे तसेच लहान खडे वगैरे असतात. धान्यातील ही घाण स्वच्छ करून एकसारख्या आकारमानाचे दाणे वेगळे काढणे आवश्यक असते.

Team Agrowon

काढणीनंतर तुर, मूग, उडीद व इतर कडधान्यामध्ये काडी, कचरा, माती, अपरिपक्व दाणे तसेच लहान खडे वगैरे असतात. धान्यातील ही घाण स्वच्छ करून एकसारख्या आकारमानाचे दाणे वेगळे काढणे आवश्यक असते. कारण बारीक आणि अपरिपक्व दाण्यापासून मिळणारी डाळ हलक्या प्रतीची असते. अशी डाळ चांगल्या डाळीत मिसळल्याने सर्वच डाळीची प्रत बिघडते म्हणून डाळ बनविण्यासाठी तुर सारख्या आकारमानाची असणे गरजेचे आहे. यालाच प्रतवारी करणे असे म्हणतात. धान्याची स्वच्छता व प्रतवारी करण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान योजने अंतर्गत तयार केलेल्या सफाई व प्रतवारी यंत्राचा वापर करावा.

पंकृवी सफाई व प्रतवारी यंत्र कसे कार्य करते ?

या यंत्राच्या चाडी मधून कडधान्य गोल चाळणीवर जाण्याचा अगोदर पंख्याद्वारे कडधान्यातील काडीकचरा स्वच्छ होतो.

चाळण्यावर कडधान्य गेल्यानंतर कडधान्य तीन प्रतीमध्ये वेगवेगळे होते. या यंत्रामध्ये पंख आणि गोल चाळणी असे दोन महत्त्वाचे भाग असतात.

यातील गोल चाळणी ही चार भागात विभागलेली आहे.

या यंत्रामध्ये तूर, मूग, उडीद तसेच इतर कडधान्य आणि धान्यांची प्रतवारी करता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT