Akola Enineers Akola
टेक्नोवन

Agriculture Technology : अकोल्यातील अभियंत्यांचे शेती अवजारांचे स्टार्टअप

दोघा अभियंता मित्रांच्या नवसंकल्पनांची कानपूर आयआयटीमध्ये घेण्यात आलेल्या स्टार्टअप २०२२ स्पर्धेत देशातील उत्कृष्ट २९ संकल्पनांमध्ये निवड झाली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला : येथील अक्षय दीपक कवळे आणि अक्षय रमेश वैराळे या दोघा अभियंता मित्रांच्या नवसंकल्पनांची कानपूर आयआयटीमध्ये (IIT Kanpur) घेण्यात आलेल्या स्टार्टअप (Agriculture Startup 2022) २०२२ स्पर्धेत देशातील उत्कृष्ट २९ संकल्पनांमध्ये निवड झाली आहे. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्टार्टअप’ या अभियानामुळे त्यांचे नाव पुढे आले आहे

बीई मेकॅनिकल शिकलेल्या अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोघांनी अकोला महानगरालगत शिवणी येथे ‘ॲग्रोश्युअर प्रॉडक्टस अँड इनोव्हेशन्स प्रा. लि. अकोला’ या उद्योगाची सुरुवात केली आहे. तेथे शेतीसाठी लागणारी अवजारे तयार केली जातात. ही अवजारे ट्रॅक्टर व विडर (Weeder) यांच्या सहाय्याने चालणारी आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही अवजारे विकसित केली आहेत. आतापर्यंत त्यांनी अशी ३५ प्रकारची यंत्रे विकसित केली असून गेल्या दोन वर्षांत हे उद्योजक ८०० शेतकऱ्यांपर्यंत आपली उत्पादने पोहोचविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. कानपूरच्या आयआयटीने भरवलेल्या स्टार्टअप स्पर्धेत या दोघांनी आपली प्रवेशिका पाठवून नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले.

त्यात ५०० जणांच्या संकल्पनांमधून सर्वोत्कृष्ट २९ संकल्पनांची निवड झाली. यामध्ये ‘ॲग्रोश्युअर’ची ही निवड आहे. त्यांना १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. त्यांनी मिनी दालमिल, पॉवर विडर, कांदा पेरणी यंत्र, बेड मेकर, मल्चिंग यंत्र आदी अवजारांची निर्मिती केली.

कौशल्य विकास विभागामार्फत जिल्हा नाविन्यता परिषदेकडूनही पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. या युवा उद्योजकांनी आतापर्यंत शेतीसाठी लागणारी विविध प्रकारची ३५ अवजारे विकसित केली आहेत. ही अवजारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून परीक्षण केली जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT