हाडावर वाढवता येईल संगणक!
हाडावर वाढवता येईल संगणक! 
टेक्नोवन

हाडावर वाढवता येईल संगणक!

टीम अॅग्रोवन

हाडावर अतिपातळ वायरलेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार करण्यात अॅरिझोना विद्यापीठातील अभियांत्रिकी शास्त्रज्ञांना यश आले आहे. या प्रकारच्या उपकरणाला ओसेओसरफेस इलेक्ट्रॉनिक्स असे नाव देण्यात आले आहे. या उपकरणामुळे हाडांचे आरोग्य आणि ते भरून येण्याच्या दीर्घकालीन प्रक्रियेवर अत्यंत जवळून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना अस्थी शल्यचिकित्सक डॉ. डेव्हिड मार्गोलिस यांनी सांगितले, की हाडांना झालेल्या मोठ्या इजांमध्ये त्यांचे आरोग्य आणि भरून येण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी असते. या दरम्यान लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने एक्स रे काढावे लागतात. त्यातून उपचाराच्या खर्चात वाढ होत जाते. हाडांचे आरोग्य सातत्याने तपासण्यासाठी ओसेओसरफेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण अत्यंत महत्त्वाचे साधन ठरणार आहे. या उपकरणाने नोंदवलेल्या पहिल्या व अचूक मोजमापामुळे माझ्या हर्षोल्हासाला पारावार राहिलेला नाही. हाडांना झालेल्या मोठ्या इजांमुळे रुग्णांना ह्रदयरोग, ब्रेस्ट कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांपेक्षाही अधिक काळ रुग्णालयात घालवावा लागतो. हाडांचे व त्याजवळ असलेल्या स्नायूंच्या आरोग्य आणि जखमा भरून येण्याची प्रक्रिया जवळून तपासणे आणि उपचाराच्या प्रक्रियेमध्ये वायरलेस बोन संगणक महत्त्वाचे ठरू शकतात. अर्थात, नुकत्याच तयार करण्यात आलेल्या या उपकरणाच्या चाचण्या अद्याप माणसांमध्ये झालेल्या नाहीत. तसेच त्याला अद्याप आवश्यक त्या परवानग्याही मिळालेल्या नसल्याची बाब जैववैद्यक अभियांत्रिकीचे सहाय्यक प्रो. फिलिप गुत्रुफ यांनी अधोरेखित केली. ...अशी आहेत वैशिष्ट्ये

  • कागदाच्या जाडीइतकीच जाडी आणि लवचिकता.
  • हाडाभोवती घट्ट चिटकून राहू शकते.
  • याला बॅटरीची आवश्यकता नाही.
  • नीअर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्राने ऊर्जा पुरवता येते. सध्या स्मार्टफोनमधून संपर्काशिवाय पैसे देण्याच्या प्रक्रियेमध्ये हे तंत्र वापरले जाते.
  • हाडाच्या पेशींप्रमाणेच कॅल्शिअम कणांपासून बनवलेल्या सिरॅमिक चिकटद्रव्यानेच हाडांशी जोडले जाते. अन्य कोणत्या चिकटद्रव्याने काही दिवस किंवा महिन्यांपेक्षा जास्त काळ चिकटून ठेवणे शक्य झाले नसते.
  • हाडाचाच एक भाग असल्याप्रमाणे जोडल्या गेलेल्या उपकरणाच्या सेन्सरपर्यंत हाडाची वाढ होत येते. त्यामुळे हाडांची वाढ, त्याची मोजमापे दीर्घकाळपर्यंत घेता येतात.
  • सध्या हाडामध्ये आधारासाठी घातलेल्या बाह्य वस्तू उदा. प्लेट्स, रॉड किंवा स्क्रू योग्य वेळी काढण्यासाठी या उपकरणाची मदत होते.
  • हाडाच्या आरोग्यासाठी दिलेल्या औषधांची परिणामकारकता किंवा साइड इफेक्टही त्वरित समजू शकतील. त्यानुसार औषधांच्या मात्राही वेळीच बदलता येतील.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    SCROLL FOR NEXT