रोबो करतो परागीकरण
रोबो करतो परागीकरण  
टेक्नोवन

परागीकरण करणारा रोबो

वृत्तसेवा

जगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत फळबागा वाढत आहेत. परंतु, मजुरांच्या टंचाईमुळे फळबागेचे व्यवस्थापन, काढणी आणि पॅकिंगवर परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन वेळीची बचत आणि कष्ट कमी करण्यासाठी फळबागांमध्ये रोबो तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. न्यूझिलंडमधील किवी आणि सफरचंद उत्पादक कंपन्यांनी फळबागेचे नियोजन सोपे होण्यासाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

रोबोनिर्मितीमधील तज्ज्ञ स्टीव्ह सॅंडर्स याबाबत म्हणाले की, फळबागेच्या व्यवस्थापनामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे. त्यामुळे आम्ही स्वयंचलीत यंत्रांच्या संशोधनावर भर दिला आहे. आम्ही प्रामुख्याने रोबो, सेंन्सर प्रणाली आणि संगणकाचा वापर फळबागांच्या व्यवस्थापनामध्ये कसा करता येईल, याबाबत तंत्रज्ञान विकसित करीत आहोत. पहिल्यांदा आम्ही किवी फळबागेमध्ये परागीकरण सुलभ होण्यासाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर केला. रोबो आणि जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रणेच्या वापरामुळे किवी फळबागेत एकसमान पद्धतीने परागीकरण झाल्याने फळांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे न्यूझिलंडमधील २५ टक्के किवी फळबागांच्यामध्ये परागीकरणासाठी आता रोबो तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आम्ही सफरचंदाचे पॅकिंग करणारा रोबो तयार केला आहे. त्याचे निष्कर्षही आशादायक आहेत. पॅकहाउसमध्ये पॅकेजिंग करणारे रोबो बसविण्यात आलेले आहेत. यामुळे पॅकेंजिग करताना मनुष्याद्वारे सफरचंदांची हाताळणी होत नाही. एका मिनिटाला १२० सफरचंदाचे पॅकिंग या यंत्रणेद्वारे होते. तीन माणसांचे काम एक रोबो करत असल्यामुळे मजूर आणि वेळेचीही बचत होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT