नटूभाई वाढेर यांनी तयार केले कापूस वेचणी यंत्र
नटूभाई वाढेर यांनी तयार केले कापूस वेचणी यंत्र  
टेक्नोवन

नटूभाई वाढेर यांनी तयार केले कापूस वेचणी यंत्र

अनामिका डे, अलजुबैर सय्यद

देशात कपाशी लागवडीखाली मोठे लागवड क्षेत्र आहे. परंतु आजही कपाशीची वेचणी ही मजुरांच्याकडून केली जाते. त्यामुळे वेळही जास्त लागतो आणि मजुरी खर्चातही वाढ झाल्याने नफा कमी राहतो. कपाशी वेचणीसाठी परदेशात यंत्रे उपलब्ध आहेत, परंतु आपल्याकडील शेतकऱ्यांचे मर्यादित लागवड क्षेत्रामुळे शेतकऱ्यांना या यंत्रांचा वापर करणे शक्य नाही. यंत्राची किंमतही जास्त आहेत. कपाशी उत्पादकांची गरज लक्षात घेऊन नटूभाई वाढेर यांनी कपाशी वेचणीसाठी यंत्राची निर्मिती केली. गरजेतून मिळाली संशोधनाला चालना ः नटूभाई रतूभाई वाढेर हे गुजरात राज्यातील प्रयोगशील कपाशी उत्पादक. नटूभाई यांची एरवाडा (ता. दसाडा, जि. सुरेंद्रनगर) गावशिवारात २४ एकर शेती आहे. दरवर्षी बहुतांश क्षेत्रावर ते कपाशीची लागवड करतात. गुजरातमधील भरूच, सुरेंद्रनगर, जुनागड, बनासकांठा, हारिज या भागांत कपाशीच्या ठराविक देशी जातीची प्रामुख्याने लागवड केली जाते. ही जात कमी पाण्यातही चांगले उत्पादन देते, तसेच एकाचवेळी कापूस वेचणीला येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी याच जातीची लागवड करतात. याचबरोबरीने बाजारपेठेच्या मागणीनुसार आणि उत्पादनानुसार इतर जातींचीही लागवड शेतकरी आता करू लागले आहेत. परंतु कापूस उत्पादकांची समस्या म्हणजे लागवड, व्यवस्थापन आणि वेचणीचा वाढता खर्च. वेचणीसाठी मजुरांची कमतरता असल्याने जादा दराने मजुरीदेऊन कपाशीची वेचणी करावी लागते. वेचणी करणारा मजूर अकुशल असेल तर बोंडामध्ये कापूस राहतो, त्यामुळे आर्थिक नुकसानीत वाढच होते. हे लक्षात घेऊन नटूभाई यांनी कापूस वेचणी यंत्र निर्मितीला सुरवात केली. साधारणपणे दहा वर्षांपासून विविध प्रयोग करून त्यांनी ट्रॅक्टरचलित कापूस वेचणी यंत्राची निर्मिती केली. या उपक्रमाला ग्यान संस्थेने तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य केले आहे. कापूस वेचणी यंत्राची वैशिष्ट्ये ः

  • ट्रॅक्टरच्यापुढे हे कापूस वेचणी यंत्र लावले जाते. या यंत्रामध्ये उभ्या सळ्या आणि त्याला चक्राकार आकाराच्या पट्टा लावलेल्या आहेत. यंत्रामध्ये कपाशीचे झाड जाऊल असी जागा ठेवलेली आहे. यंत्र झाडाच्या ओळीतून चालू लागले, की यंत्रातील सळ्या आणि चक्राकार पात्यांच्या कंपनामुळे तयार कापसाचे बोंड यंत्रांच्या तळात पडते. यंत्रामध्ये असलेल्या दोन ब्लोअरच्या मदतीने हा कापूस ट्रॅक्टरच्या मागे बसवलेल्या साठवण टाकीत जातो.
  • ही संपूर्ण यंत्रणा चालवण्यासाठी एका मनुष्याची गरज असते.
  • यंत्राच्या साह्याने एका तासात दीड एकर क्षेत्रावरील कपाशीची वेचणी पूर्ण होते.
  • यंत्र हे ट्रॅक्टरचलीत आहे. प्रतितास एक लिटर डिझेल लागते.
  • यंत्राच्या मदतीने एका तासामध्ये ६०० किलो कापसाची वेचणी होते.
  • यंत्रामुळे मजूर आणि वेळेची बचत होते.
  • या यंत्रामध्ये अधिक संशोधन करून यंत्रामध्ये सुधारणा करण्याचा नटूभाईंचा प्रयत्न आहे.
  • संपर्क ः ०७९- २६७६९६८६ (ग्यान संस्था, अहमदाबाद, गुजरात)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    SCROLL FOR NEXT