Agriculture Mechanization Scheme Agrowon
टेक्नोवन

Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरण योजनेला ५१ कोटींचा निधी

Agriculture Scheme : कृषी क्षेत्रातील वाढत्या यांत्रिकरणाचा विचार करून विविध योजनांतून शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतील आशा योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू आहे.

Team Agrowon

Nagar News : ‘‘केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला प्राधान्य दिले जात आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्याला ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे,’’ अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

लोणी खुर्द (ता. राहाता) येथेही येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाअंतर्गत विखे पाटील म्हणाले, ‘‘देशातील कृषिक्षेत्राला स्थिरता देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. कृषी क्षेत्रातील वाढत्या यांत्रिकरणाचा विचार करून विविध योजनांतून शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतील आशा योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू आहे.

किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची योजना सुरू केली. खतांच्या किमतीतील वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने सातत्याने अनुदान दिले. त्यामुळे देशात खतांचे भाव स्थिर राहिले आणि टंचाई निर्माण झाली नाही.’’

‘‘राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ शेडनेट आणि अस्तरीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन विखे-पाटील यांनी केले.

‘‘अतिवृष्टीत नुकसान झालेल्या राहाता तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांना २१ कोटी ७७ लाख रुपये, सततच्या पावसाने नुकसान झालेल्या ६ हजार शेतकऱ्यांना ९ कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने दिली आहे. व्यक्तिगत लाभार्थी योजनेत राहाता तालुका अव्वल आहे,’’ असे विखे म्हणाले.

‘कृषी योजनांमुळे विकास’

विखे-पाटील म्हणाले, ‘‘शेती हा प्रत्येकाचा आत्मा आहे. शेतीच्या विकासाला जालना मिळावी, यासाठी राज्य सरकारचे खास प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांमुळे शेती विकासाला मोठे चालना मिळत आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT