Polyhouse  Agrowon
विशेष मुलाखती

Polyhouse Technology : अधिक उत्पादनासाठी शेडनेट पॉली हाऊस तंत्रज्ञान समजून घ्या

Agriculture Technology : विकास महामंडळ पुणे व कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे करण्यात आले होते.

Team Agrowon

Jalna News : जिल्ह्यामध्ये शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याचे आवश्यक, असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे करण्यात आले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी श्री पवार बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सोमवंशी, एमसीडीसी, पुणे येथील विभाग प्रमुख, प्रशिक्षण दिगंबर साबळे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, बदनापूरचे तालुका कृषी अधिकारी जी.एम. गुजर, एमसीडीसी प्रशिक्षण अधिकारी मयूर पवार, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

श्री पवार म्हणाले, की सुरवातीचा खर्च अधिक असल्यामुळे कमी जागेपासून उभारणी शेतकऱ्यांनी केली तर त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. डॉ. सोमवंशी यांनी संरक्षित शेती केल्यास कमी जागेत उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकते.

तसेच, जिल्ह्यांतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री. साबळे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम मराठवाडा विभागामध्ये राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मयूर पवार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात घसरण, हरभरा दरात चढ-उतार, पालक दर स्थिर, फ्लॉवर दर टिकून तर पपईच्या आवकेत घट

Kharif Sowing: परभणी, हिंगोलीत तूर, मूग, उडीदाची ७० हजार हेक्टर पेरणी

Vidarbha Orange Farming : संत्रा ठरेल विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा आधार

Flood Control Project: कोल्हापूर- सांगलीचा पूरप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत शेतकऱ्यांच्या नावासमोर अर्धवट रक्कम; कोणते कर्ज माफ केले? आमदार कैलास पाटील यांचा सवाल

SCROLL FOR NEXT