animal feed  agrowon
शासन निर्णय

Animal Feed : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांसह पशुखाद्य उत्पादक कंपनीचा समितीत समावेश

Animal Feed Committee : राज्यातील दूध उत्पादक आणि पशुपालकांना किफायतशीर दरात पशुखाद्य मिळावे, यासाठी राज्य शासनाने पशु खाद्याचे दर नियंत्रणासाठी पशुसंवर्धन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

Team Agrowon

Animal Feed Quality : गेल्या काही दिवसांपासून पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पशुपालक मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे किफायतशीर आणि गुणवत्तापुर्ण पशुखाद्य उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेतखाली झालेल्या बैठकीत दूधाचे दर, पशुसंवर्धन गुणवत्ता आणि दर नियत्रंण या प्रश्नांबाबत चर्चा झाली. यावेळी दूध उत्पादक सहकारी संस्था, खासगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

राज्यात निकृष्ट दर्जाचे पशुखाद्य मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार मंत्री विखे पाटील यांच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन गुणवत्ता आणि दर नियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. पशुसवंर्धन आयुक्तांच्या अध्यतेखाली समितीत सहकारी दूध संघ, खाजगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपनी, पशूपालकांचा समावेश आहे. या समितीने  दर तीन महिन्यातून एकदा बैठक घ्यावी. या बैठकीत पशुखाद्याच्या गुणवत्ता आणि दर नियंत्रणांवर चर्चा करावी.  समितीच्या बैठकीनंतर  अहवाल राज्य सरकारला करावा, असे या समितीच्या कार्यकक्षेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT