Student Agrowon
शासन निर्णय

Maratha Students Scholarship : मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय

Students Scholarship : परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Team Agrowon

Foreign Education Scholarship : मराठा, कुणबी विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

यासाठी सजायीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता दिली असून या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी  ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत  राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सजायीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता देण्यात आली.

मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत नाही. ही बाब लक्षात घेऊन क्यु-एस वर्ल्ड रँकिगमध्ये २०० च्या आता मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार. ही योजना यंदा २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासूनच राबविण्यात येईल.


या शिष्यवृत्तीसाठी सारथी संस्थेकडून विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतील. या शिष्यवृत्तीचा लाभ अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य-अर्थशास्त्र, कला, विधी, औषध निर्माण या अभ्यासक्रमांसाठी ५० पदव्युत्तर, पदवी, पदविका आणि २५ डॉक्टरेटसाठी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल. या योजनेसाठी ५ वर्षांसाठी २७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, २०२३-२४ या वर्षासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT