कृषी योजना व शासन निर्णय

Government Fund : खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटींचा निधी

इमारतीच्या बांधकामासाठी एकूण चार कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ५० लाखांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः जिल्ह्यातील खेड पंचायत (Khed Panchayat) समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला राज्य सरकारने (State Government) प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी एकूण चार कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ५० लाखांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्याचबरोबर या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या बाबतचा ग्रामविकास विभागाचा आदेश गुरुवारी (ता. ६) जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ सप्टेंबर रोजी या बाबत एक बैठक घेतली होती.

या बैठकीतच मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. या बाबतचा कार्यारंभ आदेश देत, तत्काळ ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे ग्रामविकास विभागातील कक्ष अधिकारी विवेक शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

पंचायत समितीच्या या जागेवर याआधी मध्यवर्ती प्रशासकीय संकुल इमारत उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. हा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा आणि याच जागेवर पंचायत समितीची नवीन इमारत बांधण्याची कार्यवाही सुरू करावी, असे या आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार पंचायत समितीच्या मालकीच्या गट क्रमांक २०९ आणि २१० या जागेवर ही इमारत बांधली जाणार आहे.

खेडच्या विकासाला आढळरावांचा विरोध ः मोहिते

दरम्यान, पंचायत समितीच्या इमारतीवरून आमदार मोहिते आणि आढळराव पाटील यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खेड तालुक्याचे प्रशासकीय इमारतीचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही, असा चंग माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी बांधला असून, ते या इमारतीसाठी मंजूर झालेले २१ कोटी रुपये परत घालवीत असतील,

तर आता तालुक्यातील जनतेने त्यांच्याबाबत विचार करण्याची गरज आहे. खेडच्या विकासाला विरोध हे आढळरावांचे कायमचे धोरण आहे. प्रशासकीय इमारतीच्या कामाचे मला श्रेय मिळू नये म्हणून त्यांनी हा खटाटोप चालविला आहे.

स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांच्या नावामागे लपून ते या प्रशासकीय इमारतीच्या कामाला विरोध करीत आहेत. वस्तुतः गोरे यांचे कुटुंबीयसुद्धा त्यांच्याबरोबर शिंदे गटात गेलेले नाहीत. शिंदे गटात गेलेले भगवान पोखरकर यांनी, गोरे हयात असताना त्यांना विरोध केला होता. पण आता मात्र प्रशासकीय इमारतीच्या कामाला विरोध करायचा म्हणून हे सर्व गोरेंच्या नावाचा आधार घेत आहेत, असे मोहिते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT