Jal Jeevan Mission Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jaljeevan Mission : ‘जलजीवन’साठी ग्रामसेवक, सरपंचांना प्रशिक्षण

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती

Team Agrowon

नाशिक : जलजीवन मिशनची (JalJeevan Mission) कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणेने एकत्रित कामे करावी. ही कामे वेळेत होण्यासाठी ग्रामसेवक (Gramsevak), सरपंचांना (Sarpanch) प्रशिक्षण दिले जाणार आहे.

याशिवाय तालुकानिहाय सरपंचांच्या बैठका घेऊन संवाद साधला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

तसेच सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या (Water Scheme) मंजूर कामांच्या अंदाजपत्रकाची एक प्रत संबंधित सरपंचांना देण्यात यावी, अशा सूचना मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, १५ तालुका गटविकास अधिकाऱ्यांची समन्वय सभा बुधवार (ता. २५) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांकडून विविध राज्य व केंद्राच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संजय नारखेडे उपस्थित होते.

झालेले कामे, अपूर्ण कामे, प्रलंबित कामांसह झालेल्या खर्चाचादेखील आढावा घेतला. आचारसंहिता उठल्यानंतर प्रलंबित कामे वेगाने करावी. निधी अखर्चिक राहता कामा नये, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

जलजीवन मिशन योजनेची १,२९२ कामे मंजूर असून, प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश दिले आहे. काही ठिकाणी ही कामे सुरू झाली आहे.

मात्र कामे मंजूर होऊन सुरू झाली नाही तेथे कामे तत्काळ सुरू करावी. या योजनेची कामे पूर्ण झाल्यानंतर हस्तांतराचे अधिकार हे सरपंचांनाच असल्याचे मित्तल यांनी बैठकीत स्पष्ट केले.

मात्र ही कामे वेळात, विनाअडथळा पार पडावी यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांचे एकत्रित प्रशिक्षण घेतले जाणार आहे. यामध्ये ग्रामसेवक, सरपंच यांना शासकीय योजनांसह जलजीवनच्या कामांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT