Takari Irrigation Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’चे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचविणार

ताकारी योजनेचे यंदाचे पहिले आवर्तन सुरू होऊन २९ दिवस झाले. हे पाणी कडेगाव व खानापूर तालुक्यातील सिंचनक्षेत्राची तहान भागवून तासगाव तालुक्यातील पुणदीपर्यंत १०९ कि.मी.वर पोहोचले आहे.

Team Agrowon

वांगी, जि. सांगली ः ताकारी योजनेचे (Takari Irrigation Scheme) यंदाचे पहिले आवर्तन सुरू होऊन २९ दिवस झाले. हे पाणी कडेगाव व खानापूर तालुक्यातील सिंचनक्षेत्राची (Agriculture Irrigation) तहान भागवून तासगाव तालुक्यातील पुणदीपर्यंत १०९ कि.मी.वर पोहोचले आहे. मुख्य कालव्याच्या शेवटच्या शेतापर्यंत मागणीनुसार मुबलक पाणी पोहोचल्याशिवाय आवर्तन बंद केले जाणार नाही, असे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले.

यंदा मॉन्सूनसह परतीच्या पावसाने ताकारी लाभक्षेत्राला झोडपल्याने ताकारी योजना दोन महिने उशिरा ६ डिसेंबरला सुरू झाली. योजना उशिरा सुरू झाल्याचा लाभ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या टप्पा १ व २ वरील प्रत्येकी ११ पंप सुरू आहेत.

टप्पा ३ वरील २ पंप आणि टप्पा ४ वरील २ पंप सुरू असल्याने सोनहिरा खोऱ्यातही सर्वत्र पाणी वाहत आहे. मुख्य कालव्यातील पाण्याने १०९ कि.मी. पुणदीपर्यंत पल्ला गाठला आहे.

बारमाही पिकांना संजीवनी मिळाली असून रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. येरळेला पाणी झिरपून जात असल्याने येरळाकाठच्या सर्वच गावांच्या पाणीपुरवठा योजनांना या पाण्याचा पुढील किमान महिनाभर लाभ होणार आहे.

योजनेवरील शेतकऱ्यांची मागणी आल्यास पाणी मुख्य कालव्याच्या शेवटच्या सुमारे १४२ कि.मी.पर्यंत पोहोचवले जाणार आहे. योजनेवर जास्तीत जास्त सिंचनक्षेत्र वाढवून पाणीपट्टी वेळेत भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन डवरी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT