Fruit Orchard Cultivation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Horticulture : फळे, फुले, मसाला लागवड योजनेचा लाभ घ्यावा

Horticulture Scheme : ‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी अनुदान देण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी अनुदान देण्यात येत आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविण्यास जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्याचा हेतू त्यामागे आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.

‘‘आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’ या पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा’’, असेही सोवनणे यांनी कळविले आहे.

...अशी आहे अनुदानाची मर्यादा :

फुले लागवड :

कट फ्लॉवर्स :

- अल्पभूधारक शेतकरी - हेक्टरी १ लाख रुपये (खर्चाच्या ४० टक्के अथवा ४० हजार रुपये हेक्टरी)

- इतर शेतकरी - हेक्टरी १ लाख रुपये (खर्चाच्या २५ टक्के अथवा २५ हजार रुपये हेक्टरी).

कंदवर्गीय फुले :

- अल्पभूधारक शेतकरी - हेक्टरी १.५ लाख रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल ६० हजार रुपये हेक्टरी).

- इतर शेतकरी - १.५ लाख रुपये हेक्टरी (एकूण खर्चाच्या २५ टक्के अथवा कमाल ३७ हजार ५०० रुपये हेक्टरी).

सुटी फुले :

- अल्पभूधारक शेतकरी - ४० हजार रुपये हेक्टरी (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल १६ हजार रुपये हेक्टरी).

- इतर शेतकरी - हेक्टरी ४० हजार रुपये (एकूण खर्चाच्या २५ टक्के अथवा कमाल १० हजार रुपये हेक्टरी).

मसाला पीक लागवड :

- बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिके - हेक्टरी ३० हजार रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल १२ हजार रुपये हेक्टरी).

- बहुवर्षीय मसाला पिके - हेक्टरी ५० हजार रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल २० हजार रुपये हेक्टरी).

परदेशी फळपीक लागवड :

ड्रॅगनफ्रूट - हेक्टरी ४ लाख रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल एक लाख ६० हजार रुपये हेक्टरी).

स्ट्रॉबेरी - हेक्टरी २ लाख ८० हजार रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल एक लाख १२ हजार रुपये हेक्टरी).

अवॅकॅडो - हेक्टरी एक लाख रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल ४० हजार रुपये हेक्टरी).

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन - हेक्टरी ४० हजार रुपये (एकूण खर्चाच्या ५० टक्के व कमाल हेक्टरी २० हजार रुपये).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain: राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागात पावसाचा अंदाज 

Chana Threshing: खानदेशात हरभरा मळणी पूर्णत्वाकडे

Reservoir Levels Drop: सातपुड्यातील सिंचन प्रकल्पांत जलसाठा घटला

Sprouted Grains: मोड आलेल्या कडधान्यांपासून पौष्टिक पदार्थ

Unseasonal Rain: अवकाळी, गारपिटीचे शेतकऱ्यांवर संकट, पीक नुकसानीचे तातडीने मुल्यांकन करण्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT