Agriculture Implement Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Oil Seed Subsidy : ‘गळीतधान्य, तेलबिया’ योजनेचे अनुदान रखडले

राज्यात राबवल्या जात असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीतधान्य व तेलबिया पीक योजनेतून ‘महाडीबीटी’ पोर्टलवर निवड होऊन साहित्य खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही.

टीम ॲग्रोवन

अकोला ः राज्यात राबवल्या जात असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (National Food Security Mission) गळीतधान्य व तेलबिया पीक योजनेतून (Oil Seed Crop Scheme) ‘महाडीबीटी’ पोर्टलवर (MahaDBT Portal) निवड होऊन साहित्य (Agriculture Implements) खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान (Subsidy) मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी चौकशी करून थकले आहेत.

अकोला जिल्ह्यात सुमारे ४५० शेतकरी एक कोटी १५ लाख रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारचे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीतधान्य व तेलबिया पीक योजनेसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज मागविले जातात. त्यानंतर सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. पूर्वसंमती मिळालेले शेतकरी संबंधित साहित्याची खरेदी करतात.

इलेक्ट्रिक मोटर, रोटाव्हेटर, मळणीयंत्र, डिझेल यंत्र अशा विविध साहित्यांसाठी अनुदानाची तरतूद आहे. खरेदी साहित्याच्या ५० टक्के किंवा निश्‍चित केलेल्या रकमेपैकी जी रक्कम कमी असेल तेवढा लाभ दिला जातो.

इलेक्ट्रिक मोटरपंपासाठी साधारणतः १० हजार, रोटाव्हेटरला ३५ ते ४२ हजार, डिझेल इंजिनला १० हजार अशा वेगवेगळ्या यंत्रानुसार अनुदान देण्याची तरतूद असल्याचे समजते. शासनाकडून सध्या विविध योजनांचे अनुदान खात्यात जमा केले जात असतानाच गळीतधान्य व तेलबिया पीक योजनेसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहेत.

दिवाळी तोंडावर; शेतकरी चिंतेत

लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केलेल्यांची कागदपत्रे अपलोड करून पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांनी संबंधित साहित्य खरेदी केल्यानंतर आणि त्याचे बिल अपलोड झाल्यावर मोका तपासणी करण्यात येते. नंतर संबंधित लाभार्थी अनुदानासाठी पात्र मानला जातो. या सर्व प्रक्रियेला सुमारे सहा ते सात महिन्यांचा काळ लोटला आहे. अद्याप एकाही शेतकऱ्याचे अनुदान खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे हे शेतकरी आता दिवाळीच्या तोंडावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनुदानाविषयी सातत्याने चौकशी करीत आहेत. मात्र स्थानिक स्तरावर या बाबत अनुदान कधी येईल, याची कुठलीही माहिती दिली जात नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT