Warehouse Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदाम बांधकामासाठी अनुदान

विविध केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत २०२२-२३ या योजनेअंतर्गत २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः केंद्र पुरस्कृत विविध योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Company), शेतकरी संघ यांना २५० टन शेतीमाल साठवणूक (Agriculture Produce Storage) क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी (Warehouse Construction) प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली.

विविध केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत २०२२-२३ या योजनेअंतर्गत २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडित असून, इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी संघ यांना अर्ज सादर करता येतील. यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाइन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाज पत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे.

गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषिमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारून करावा. याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराइज्ड हमीपत्र आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आधार कार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे ता. ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी सादर करावेत.

पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पद्धतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उत्पादक संघ, कंपनी यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT