PM Kusum Solar Pump Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kusum Scheme : परभणीत ‘पीएम कुसुम’अंतर्गत २९९० शेतकऱ्यांना सौर कृषिपंप

Agriculture Scheme : प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) परभणी जिल्ह्यात २०२१ पासून आजवर २ हजार ९९० शेतकऱ्यांच्या शेतावर सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.

Team Agrowon

Parbhani News : प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) परभणी जिल्ह्यात २०२१ पासून आजवर २ हजार ९९० शेतकऱ्यांच्या शेतावर सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत आजवर आलेल्या शेतकरी अर्जापैकी ६४ हजार ७९२ अर्ज परिपूर्ण आहेत, अशी माहिती महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड यांनी दिली.

या योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये परभणी तालुक्यातील ५९०, जिंतूर तालुक्यातील २४८, सेलू तालुक्यातील ३९३, मानवत तालुक्यातील २३२, पाथरी तालुक्यातील ३६१, सोनपेठ तालुक्यातील २, गंगाखेड तालुक्यातील ६८,

पालम तालुक्यातील ६१, पूर्णा तालुक्यातील १ हजार १२१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पीएम कुसुमअंतर्गत लाभासाठी अटल सौर कृषिपंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना २ व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरीदेखील पात्र असतील.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीकडे अर्ज केलेले पात्र परंतु सौर कृषिपंप वाटप न झालेले लाभार्थी पात्र राहतील.

महाऊर्जामार्फत सुरू केलेल्या ऑनलाइन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी महाऊर्जा, जिल्हा कार्यालय, वसमत रोड, परभणी येथे संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT