PM Kisan fund agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : पंचाहत्तर हजार शेतकरी वंचित राहणार

Agriculture Scheme : खानदेशातील सुमारे ७५ हजार खातेधारक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून केवायसीची पूर्तता न केल्याने या निधीपासून वंचित राहणार आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील सुमारे ७५ हजार खातेधारक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून केवायसीची पूर्तता न केल्याने या निधीपासून वंचित राहणार आहेत.

याबाबत शेतकऱ्यांना केवायसीबाबत सतत आवाहन करण्यात आले. परंतु केवायसी होऊ शकली नाही. कारण खानदेशात अनेक शेतकरी सातपुड्यातील दुर्गम पाड्यांवर राहतात. त्यांना कृषी विभागाने सहकार्य केले नाही.

कारण कृषी विभागाकडे या योजनेचे काम दिले, पण कृषी सहायक, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे योजनेच्या पोर्टलवर निर्णय घेण्यासाठी किंवा नोंदणी, मंजुरी यासाठीचे आवश्यक आयडी-पासवर्ड नाहीत.

काही राजकीय पक्षांनी योजनेसंबंधी जनजागृती केली. जाहिराती केल्या, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे ही मंडळी पोचलीच नाही. यामुळे देखील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले, ते अर्ज नामंजूर झाले. पण ते का नामंजूर झाले, याची उत्तरे मिळत नाहीत. यामुळेही संताप आहे. तहसीलदार कार्यालयात कुणी एेकून घेत नाही. तेथून कृषी विभागाकडे जा, असे सांगितले जाते. शेतकऱ्यांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

२०१९ नंतर अनेकांनी शेत जमीन खरेदी केली. काहींना वारसा हक्काने त्यांच्या वडिलांनी जमीन स्वमर्जीने हयात असताना दिली. अशा जमीनधारकांचे अर्ज पोर्टलवर मंजूर होत नसल्यानेही अडचण आहे.

काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अपडेट नाहीत, बॅँक अकाउंट व नावाची अडचणही कायम आहे. ही दुरुस्ती शेतकरी कृषी विभागात जाऊन करून घेऊ शकत नाहीत. कारण कृषी विभाग याबाबतचे कामच करीत नाही. फक्त घोषणाबाजी सुरू आहे, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

खानदेशातील सुमारे साडेसहा लाख शेतकरी किंवा खातेधारक शेतकरी या योजनेतून निधी मिळण्यासंबंधी पात्र ठरले आहेत. त्या जळगाव जिल्ह्यातील चार लाख ५१ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

‘नमो निधी’ पुढील महिन्यात

किसान सन्मान निधी वितरण करताना राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना या महिन्यात पैसे दिलेले नाहीत. हा निधी पुढील महिन्यात येणार आहे. ज्यांची केवायसी अपूर्ण आहे, ते शेतकरी राज्य शासनाच्या नमो सन्मान निधीपासूनही वंचित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT