पाणंद रस्ता Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

पुरंदर तालुक्यामध्ये ४७ पाणंद रस्त्यांना मंजुरी

महात्मा गांधी राष्ट्रीय स्वयंरोजगार योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमध्ये पुरंदर तालुक्यातील सुमारे ४७ पाणंद रस्त्यांना नुकतीच मंजुरी मिळाली असून, लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. नुकत्याच झालेल्या पुणे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

टीम ॲग्रोवन

पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय स्वयंरोजगार योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमध्ये पुरंदर तालुक्यातील सुमारे ४७ पाणंद रस्त्यांना नुकतीच मंजुरी मिळाली असून, लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. नुकत्याच झालेल्या पुणे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

प्रत्येकी एक किलोमीटर अंतर असलेले पाणंद रस्ते शेतकऱ्यांसाठी आपल्या शेताच्या बांधापर्यंत जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शेतीसाठी रस्ता अत्यंत उपयोगी असून, त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठीची अवजारे व उपकरणांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरतो. ग्रामीण भागात शेतरस्त्यांच्या अभावामुळे व असलेले शेतरस्ते अडविले गेल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणंद रस्ते शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. रस्त्यांची अडवणूक किंवा शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांची गरज नसलेल्या गोष्टींवरून नाहक शोषण होत आहे.

गावोगावच्या शेतकऱ्यांनी शेत रस्त्याबाबत प्रशासनासमोर गाऱ्हाणे मांडले. त्याची दखल आमदार संजय जगताप यांनी घेत शासनाची मातोश्री पाणंद शेतरस्ता योजना तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. सर्वाधिक निधी पुरंदर तालुक्यात शेतरस्ते बनवण्यासाठी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी काळाणे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT