अमरावती : अतिवृष्टीने (Wet Drought) बाधित शेतजमीन व पिकांच्या नुकसानीपोटी (Crop Damage) जाहीर करण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी (Government Scheme) तालुका पातळीवर वर्ग केली आहे. जिल्ह्यात ३ लाख ८ हजारावर हेक्टर क्षेत्राची हानी झाली असून, त्यापोटी ५३३ कोटी १४ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील २ लाख ९१ हजार ९१९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांसह मूग व उडदाचे अपरिमित नुकसान झाले आहे. २ लाख ५६ हजार ९५५ हेक्टरमधील कोरडवाहू पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. तर १५५२ हेक्टर बागायती व ५० हजार ८४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करून राज्य सरकारने नुकसानभरपाई घोषित केली आहे. जिल्ह्यास एकूण ५३३ कोटी १४ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्ह्यांना ही मदतवाटप करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांना नुकसानभरपाई वितरित केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम डीबीटी पद्धतीने जमा केल्या जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नुकसान झालेले क्षेत्र व नुकसानभरपाई क्षेत्रशेतकरी संख्याबाधित क्षेत्र
नुकसानभरपाई (कोटी रुपये)
कोरडवाहू २,४०,९८० २,५६,९५५ ३४९.४५
बागायती २,०६२ १,२५२ ३३.१८
फळबागा ४८,८७७ ५०,०८४ १८०.३०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.