Crop Damage
Crop Damage Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Heavy Rainfall : पाचोऱ्यात पावसाने नुकसान

टीम ॲग्रोवन

नंदुरबार : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PM Crop Damage Scheme) पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२०२३ (Fruit Crop Insurance Scheme 2022-2023) साठी नंदुरबार जिल्ह्यासाठी केळी, पपई, आंबा या फळ पिकांना (Fruit Crop) लागू करण्यात आली असून, या फळपीक विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manish Khatri) यांनी केले आहे.

योजनेत समाविष्ट फळपिके, विमा संरक्षित रक्कम, शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा दर पुढील प्रमाणे: केळी व आंबा फळ पिकासाठी १ लाख ४० हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना ७ हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. तर पपईसाठी ३५ हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना १ हजार ७५० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून ग्राहक सेवा क्रमांक १८००१०२४०८८ असा आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी व पपई फळपिकासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ तर आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे.

पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यात येणार असून, यासाठी जवळच्या कॉलम सर्व्हिस सेंटर अथवा आपले सरकार सेवा केंद्र, जनसुविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT