PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : पंतप्रधान सन्मान योजनेच्या ‘ई-केवायसी’चे सर्व्हर डाउन

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र आठ दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्यामुळे शेतकऱ्यांवर ई-सेवा केंद्रांवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PM Kiasan Scheme) ‘ई-केवायसी’ (PM Kisan e-KYC) करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र आठ दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्यामुळे शेतकऱ्यांवर ई-सेवा केंद्रांवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. ई-केवायसी व नवीन नोंदणीही करता येत नाही. ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सव्वा लाखावर शेतकऱ्‍यांनी ई-केवायसी केली नाही.

केंद्राने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतात. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा सरसकट शेतकऱ्‍यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लोकप्रतिनिधी, शासकीय नोकरदार आणि प्राप्तिकर भरणाऱ्‍यांना या योजनेतून वगळले आहे.

जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ५८४ नोंदणीकृत लाभार्थींपैकी २ लाख ४२ हजार ३७ जणांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १ लाख ९४ हजार ५४७ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलैअखेर ‘ई-केवायसी’ पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ई-केवायसी करीत आहेत. मात्र सर्व्हर डाउन असल्याने केवायसीत अडथळे निर्माण झाले. प्रशासनाने सर्व्हर डाउनवर तत्काळ मार्ग काढावा, अशी मागणी सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Processing: शेतकरी उत्पादकासोबत प्रक्रियादार, निर्यातदार व्हावा : मंत्री रावल

Irrigation For Agriculture : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळणे हीच प्राथमिकता

Blue Green Algae: भात पिकासाठी निळे-हिरवे शेवाळ ठरते फायदेशीर; नत्राची बचत करण्यासाठी मदत

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

Solapur ZP : ६८ सदस्य, ८५ कोटी निधी, तरीही गणित जुळेना

SCROLL FOR NEXT