Employment Guarantee Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Employment Guarantee Scheme : चाळीस हजारांवर आदिवासी मजूर बेरोजगार

Rojgar Hami Yojana Update : अमरावती मेळघाटातील आदिवासी बांधवांना रोजगार हमी योजनेचा मोठा आधार आहे.

Team Agrowon

Employment Guarantee Scheme In Amravati : अमरावती मेळघाटातील आदिवासी बांधवांना रोजगार हमी योजनेचा मोठा आधार आहे. परंतु गटविकास अधिकारी संघटनेने रोहयोवर बहिष्कार घातल्याने मेळघाटातील ४० हजारांवर आदिवासी बांधवांना काम मिळणे कठीण झाले आहे. त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नसुद्धा गंभीर झाला आहे.

शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत आज घडीला चिखलदरा तालुक्यातील सुमारे ४० हजारांवर मजुरांची नोंद शासनदरबारी असून, हे मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर जातात. त्यातूनच त्यांना आर्थिक मिळकत प्राप्त होते व ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात.

मात्र राज्यातील गटविकास अधिकारी संघटना तसेच महाराष्ट्र विकास अधिकारी संघटना यांनी रोजगार हमी योजनेची काम न करण्याचे ठरविले असून, तसा बहिष्कारही टाकला आहे.

राज्यातील सर्वच गटविकास अधिकारी हे रोजगार हमी योजनेचे मस्टर काढत नसल्यामुळे सद्यःस्थितीत चिखलदरा तालुक्यातील कामे बंद आहेत. त्यामुळे चिखलदरा तालुक्यातील विविध रोहयोची सगळीच कामे बंद आहेत. परिणामस्वरूप आदिवासी बांधव सद्यःस्थितीत बेरोजगार झाले असून त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे.

सध्या उन्हाळा सुरू असून, आदिवासी बांधवांना हाच एक वेळ पैसे कमाविण्याचा असतो. पावसाळा सुरू झाला की तशीच रोजगार हमी योजनेची कामे बंद होतात आणि मेळघाटात रोजगाराचे कोणतीही कामे राहत नाहीत. त्यामुळे आदिवासी बांधवांना जीवन जगण्यासाठी व जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिक सोर्स कोणताही नसतो.

मात्र सध्या स्थितीत ही कामे बंद असल्यामुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातूनच मोठ्या प्रमाणात कुपोषण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य शासनाने यावर उपाय काढून लवकरात लवकर कामे सुरू करावीत, अशी मागणी मेळघाटातील आदिवासी बांधवांकडून होत आहे.

परिपत्रकात अडचणी

रोजगार हमी योजनेच्या शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकात मोठ्या प्रमाणात अडचणी असल्याची माहिती आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना काम करणे अडचणीचे जात असल्याने त्यांनी कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

संपूर्ण राज्यातील गटविकास अधिकारी संपावर आहेत. त्यामुळे मास्टर निघत नाही. रोजगार हमी योजनेच्या कामावर आमचा बहिष्कार आहे. या योजनेच्या शासन परिपत्रकात त्रुटी असल्यामुळे काम करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच गटविकास अधिकारी व संघटनेने रोजगार हमी योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.
जयंत बाबरे, गटविकास अधिकारी, चिखलदरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khet Bachao Abhiyan: देशभरात २२ ऑक्टोबरपासून ‘शेत वाचवा' अभियानाला सुरुवात; केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, फ्लॉवरच्या आवकेत बदल, मेथीच्या दरात चढ-उतार तर केळीचे दर स्थिर

Crop Damage Panchnama: दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू; केंद्राचे पथक लवकरच महाराष्ट्रात : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या

Urea Treatment: वाळलेल्या पिकांपासून घरच्या घरी बनवा जनावरांसाठी पौष्टिक चारा

SCROLL FOR NEXT