Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : साडेसहा लाख शेतकऱ्यांना विमाभरपाई अदा

यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमबाबी अंतर्गत पीक नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा भरपाईची रक्कम जमा केली जात आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) या जोखीमबाबी अंतर्गत पीक नुकसानीच्या पूर्वसूचना (Crp Damage Intemation) दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. सोमवार (ता. २१) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार २०५ शेतकऱ्यांना ६६ कोटी ५० लाख रुपये आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ८५१ शेतकऱ्यांना ८८ कोटी ३५ लाख ९४ हजार रुपये, असे दोन जिल्ह्यांतील ६ लाख ५६ हजार ५६ शेतकऱ्यांना १५४ कोटी ८५ लाख ९४ हजार रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

जून ते ऑक्टोंबर या कालावधी अतिवृष्टी, पूर स्थिती या नैसर्गिक संकटामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी पीकविमा भरपाईसाठी ४ लाख ९० हजार ४८६ पूर्वसूचना पीकविमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत.

त्याअनुषंगाने सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर गणना करून ३ लाख ४९ हजार १८७ शेतकऱ्यांना ७२ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपये एवढी विमा परताव्याची रक्कम निश्‍चित करण्यात आली. अजून १ लाख ४१ हजार २९९ पूर्वसूचनांचा विमा परतावा निश्‍चित करणे बाकी होती. सोमवार (ता. २१) पर्यंत ३ लाख १४ हजार २०५ शेतकऱ्यांना ६६ कोटी रुपये अदा करण्यात आले. त्यात १ हजार रुपयांपेक्षा कमी परतावा मंजूर शेतकऱ्यांची संख्या १३ हजार ८९९ आणि परताव्याची रक्कम ६५ लाख ८५ हजार रुपये आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीकविमा भरपाईसाठी ४ लाख ४७ हजार ८४२ पूर्वसूचना पीकविमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी ३ लाख ६६ हजार ३९४ शेतकऱ्यांना ९६ कोटी ३५ लाख रुपये एवढी विमा परताव्याची रक्कम निश्‍चित करण्यात आली. अजून ८१ हजार ४४८ पूर्वसूचनांचा विमा परतावा निश्‍चित करणे बाकी होते.

सोमवार (ता. २१) पर्यंत ३ लाख ४१ हजार ८५१ शेतकऱ्यांना ८८ कोटी ३५ लाख ९४ हजार रुपये अदा करण्यात आले. त्यात १ हजार रुपयांपेक्षा कमी परतावा मंजूर शेतकऱ्यांची संख्या ६ हजार ६७० आणि त्यांच्या परताव्याची रक्कम ३७ लाख ४८ हजार रुपये आहे. बँक खाते क्रमांकातील चुकीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परताव्याची रक्कम जमा करण्यास अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT