Gharkul Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Gharkul Scheme : पंतप्रधान घरकुल योजनेत नातेपुतेचा समावेश

नातेपुते नगरपंचायतीचा पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये समावेश झाल्याची माहिती नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी दिली

Team Agrowon

Gharkul Scheme नातेपुते : नातेपुते नगरपंचायतीचा पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये समावेश झाल्याची माहिती नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी दिली.

उपनगराध्यक्ष श्री. देशमुख म्हणाले, पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत (PM Awas Scheme) दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून, यामध्ये राज्य शासनाचे एक लाख ५० हजार व केंद्र शासनाचे एक लाख रुपये अनुदान राहणार आहे.

या योजनेमध्ये कच्च्या घरांचा समावेश असून त्यामध्ये लोड बेअरिंग, पत्र्यांच्या, कच्च्या घरांचा समावेश असणार आहे. पक्क्या व स्लॅबची घरे असणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.

पंतप्रधान घरकुल योजनेसंदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिद्धीकरण आम्ही करणार आहोत व नागरिकांकडून योजनेसंदर्भात प्रस्तावाची मागणी करणार आहोत. शहरात घरोघरी जाऊन सर्व्हे करून डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणार आहोत.

जी घरे या योजनेत समाविष्ट होणार आहेत, अशा घरांचे प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनाला सादर करणार आहोत व त्याचा पाठपुरावा करून लवकरच ही योजना कशी मंजूर होऊन येईल याकडे पाठपुरावा करणार आहोत.

उपनगराध्यक्ष देशमुख पुढे म्हणाले, नातेपुते शहरातील नागरिकांना महत्त्वाचे आव्हान आम्ही करतो की, मार्चअखेर असल्याने सर्व नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी त्वरित भरणा करावी.

या वेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माऊली पाटील, नगरसेवक अतुल पाटील, रणजित पांढरे, अतुल बावकर, बाळासाहेब काळे, सुरेंद्र सोरटे, रणवीर देशमुख, नंदू लांडगे, अविनाश दोशी, शक्ती पलंगे, अशोक जावरे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT