Jal Jeevan Mission Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’ची कामे तत्काळ पूर्ण करा

Water Scheme : सन २०२० ते सन २०२३ पर्यंत जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींचा समावेश सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमात करण्यात आला असून यापैकी ३०९ ग्रामपंचायतींना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

Team Agrowon

Parbhani News : सन २०२० ते सन २०२३ पर्यंत जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींचा समावेश सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमात करण्यात आला असून यापैकी ३०९ ग्रामपंचायतींना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे गुणवत्ता युक्त व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिल्या.

गुरुवारी (ता. १) व शुक्रवारी (ता. २) सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच जल जीवन मिशन योजनेत निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता, साहाय्य संस्थेचे प्रमुख यांच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे, उपअभियंता आर. जी. धाबे, आर. आर. मातेकर, बी. डी. बार्शीकर, एस. एस. घुगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पाण्याच्या नियोजनासाठी शोषखड्डे, खतखड्डे, प्लास्टिक संकलन युनिट, स्थिरीकरण तळे अशा विविध कामांचा समावेश सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत करण्यात आला आहे. सदरची कामे तंत्रशुद्ध व गुणवत्तापूर्ण करून ता. ३० जून पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना खांडेकर यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन समिती अंतर्गत जल जीवन मिशनची कामे सुरू न झालेल्या गावांतील सरपंच आणि ग्रामसेवक यांची सुनावणी ता. २३ मे रोजी घेण्यात आली.

अंधापुरी, उमरा (ता. पाथरी), धमधम (ता. जिंतूर) या गावांमध्ये आणखी जल जीवन मिशन ची कामे सुरू झाली नाहीत. अशा गावातील कामे तत्काळ सुरू करा अन्यथा सदर कामे रद्द करण्याचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना आंचल गोयल यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT