Gharkul Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Gharkul Scheme : ऐन थंडीत कुटुंबे उघड्यावर

ऐन थंडीत घरकुल बांधकाम थांबवल्यामुळे आदिवासी कुटुंब मुलाबाळांसहित हवालदिल झाले आहे.

Team Agrowon

खर्डी : प्रत्येक गोरगरिबाला स्वतःचे छप्पर मिळावे यासाठी शासन घरकुल योजनेची (Gharkul Scheme) अंमलबजावणी सर्वत्र करीत आहे.

परंतु शहापूर तालुक्यातील दहिगाव येथील दोन कुटुंबांनी आपले राहते घर पाडून त्याठिकाणी मंजूर घरकुलाअंतर्गत बांधकामाला सुरुवात केल्यानंतर ग्रामसेवकाने संबंधित कुटुंबांना तांत्रिक अडचणीचे कारण देत काम बंद केल्याने आदिवासी कुटुंबावर ऐन थंडीत (Cold Weather) उघड्यावर राहाण्याची वेळ आली आहे.

ऐन थंडीत घरकुल बांधकाम (Gharkul House Work) थांबवल्यामुळे आदिवासी कुटुंब मुलाबाळांसहित हवालदिल झाले आहे.

याबाबत लोकप्रतिनिधी मूग गिळून बसल्याने होणारा अन्याय दूर करून आमच्या हक्काचे छप्पर आम्हाला मिळवून द्यावे व आमच्या मुलाबाळांचे रक्षण करावे, अशी भावनिक साद घालत आहे.

पळशीन येथे गेल्या ५० वर्षांपासून गंगुबाई चौधरी व संजय चौधरी हे राहत आहेत. त्यांचे कारवीच्या काड्यांच्या पडक्या घरात वास्तव्य होते.

त्यांनी घरकुल मिळावे म्हणून अर्ज केल्यावर शासकीय यंत्रणेने सर्व्हे करून त्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये घरकुल मंजूर झाले.

घरकुल मंजूर झाल्याने ग्रामसेवकांनी त्यांना घर पाडून घरकुल बांधण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्यांनी आपली झोपडी पाडून घरकुलाची पायाभरणीही केली.

त्यांना घरकुलाचा १५ हजार रुपयांचा एक हप्ताही मिळाला होता; परंतु अचानक ग्रामसेवकाने स्थानिक तक्रार आल्याचे सांगून घरकुलाचे काम बंद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT