Jal Jeevan Mission  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jaljeevan Mission : ‘टाकळी भीमा’च्या पाणीपुरवठ्याला पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर

शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा या गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वडघुले यांनी दिली आहे.

Team Agrowon

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा या गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत (Jaljeevan Mission) पाणी पुरवठ्यासाठी (Water Supply) ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वडघुले यांनी दिली आहे.

टाकळी भीमा (ता. शिरूर) या गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत होती. तालुक्याचे आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून शासनाकडून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

त्यामुळे या गावातील पाणी प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या योजनेमुळे गावातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर घरोघरी नळ जोडणी करून घरोघरी पाणी मिळणार असल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

श्री. वडघुले म्हणाले, की या योजनेसाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. तसेच गावातील इतर सुख सोयींसाठी आम्ही संबंधित विभागांशी पाठपुरावा करत होतो.

या कामासाठी देविदास करपे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र शिंदे, सरपंच कोमल माहुलकर, उपसरपंच सविता घोलप, ग्रामपंचायत सदस्य सुमन वडघुले, सुनंदा काळे, रेणुका गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence Farming: आता आंबा, काजूसाठी देखील ‘एआय’केंद्री ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

High Oleic Groundnut: उच्च ‘ओलिक’ भुईमुगाचे दोन नवे वाण विकसित

Khanesh Banana Cultivation: मृग बहर केळी लागवड खानदेशात वाढण्याचे संकेत; क्षेत्र ८० हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता

Maharashtra Heavy Rain: राज्यात २०८ मंडलांत अतिवृष्टी

Maharain Portal Technical Issue : ‘महारेन’ संकेतस्थळाचा संथ वेग; मंडलनिहाय माहितीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

SCROLL FOR NEXT