Central Government Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Central Government Scheme : शेतीमाल निर्यातीच्या दृष्टीने तोडगा काढा ः ललित पाटील

भारतीय शेतीमाल निर्यातीच्या दृष्टीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी सूचना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील बहाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत घेतलेल्या भेटी दरम्यान केली.

Team Agrowon

अकोला ः भारतीय शेतीमाल निर्यातीच्या दृष्टीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना (Central Government Scheme) केल्या पाहिजेत, अशी सूचना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील बहाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्यासोबत घेतलेल्या भेटी दरम्यान केली.नाशिक दौऱ्यात बहाळे यांनी डॉ. पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या काही प्रश्‍नांवर सविस्तर भूमिका मांडली.

ते म्हणाले, द्राक्ष, ‘‘कांदा व इतर सर्वच शेतीमालाच्या निर्यातीच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाय असणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या धरसोड धोरणामुळे शेतकरी, व्यापारी पूर्णपणे खचला आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईस आली असून कर्जबाजारीपणाने तो वेढला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.

सरकारने आयात वाढवली निर्यात घटवली. निर्यात शुल्क काढून घेतले. त्यामुळे व्यापार थांबला. हे सर्व काही मारक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना व्हायला हव्यात. दिल्लीत संबंधित खात्यांचे मंत्री, अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन यावर योग्य तो मार्ग काढण्याबाबत प्रयत्न करणार आहे,’’ असे डॉ. भारती पवार म्हणाल्या.

या वेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देविदास अण्‍णा पवार, विलास ताथोड, शंकरराव ढिकले, अर्जुन तात्या बोराडे, शैलेंद्र कापडणीस, बाळासाहेब शेवाळे यांच्यासह इतर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT