Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmers Debt Relief Scheme : नागपुरात १० मिनिटांत जमा झाले शेतकऱ्यांचे अनुदान

Team Agrowon

Nagpur News : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान केवळ १० मिनिटांत बॅंकेकडे वळते करण्यात आले. जिल्ह्यातील २ हजार ३६२ लाभार्थ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे.

बॅंकेच्या खात्यात ११ कोटी ६ लाख ७४ हजार २२१ रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाल्या नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या.

त्यानुसार बॅंकेच्या महाल येथील मुख्य कार्यालयात बावनकुळे यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन निधी याबाबतची माहिती बॅंक अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

यावेळी अधिकाऱ्यांनी अडचणींचा पाढाच वाचला. अडचणी समजून घेत बावनकुळे यांनी सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रोत्साहन अनुदान जारी करण्याची विनंती केली.

यावर अतिरिक्त मुख्य सचिवांनी अनुदान जारी केले जाणार असल्याचे सांगितले. काही वेळ बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलत असतानाच १० मिनिटांच्या आतच मध्यवर्ती बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान बॅंकेकडे वळते करण्यात आल्याची बातमी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.आर. नाईक यांनी दिली.

आतापर्यंत २ हजार ५९४ खातेधारकांना लाभ

२०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज घेऊन कोणतेही दोन वर्षे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या योजनेचे नागपूर जिल्ह्यातून ७ हजार ३७३ शेतकरी पात्र ठरले होते.

तर, मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे २ हजार ६५० पात्र खातेधारक प्रोत्साहनपर राशीच्या प्रतीक्षेत होते. त्यापैकी २३५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही दिवसांपूर्वी मिळाला होता.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे आहे. मागील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी त्याची अंमलबजावणी करण्याचे व लाभ देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच केले आहे. अर्थसंकल्पातून फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला प्रत्येक शब्द ते पाळतील.
चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT