Drip Irrigation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Irrigation Subsidy : तुषार, ठिबक सिंचन अनुदानासाठी परवड

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या तुषार, ठिबक सिंचन संचाचे एका वर्षात दोन हजार शेतकऱ्यांचे चार कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे.

Team Agrowon

Irrigation Scheme नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत (Irrigation Scheme) प्रति थेंब अधिक उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या तुषार, ठिबक सिंचन (Drip Irrigation) संचाचे एका वर्षात दोन हजार शेतकऱ्यांचे चार कोटी रुपयांचे अनुदान (Subsidy) थकले आहे.

शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरविण्यात येतात. ‘महाडीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते.

यानंतर खरेदी प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. हे अनुदान केंद्र तसेच राज्य शासन वितरित करते. मागील काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ब्रेक लागला आहे.

२०२१-२२ या वर्षातील १३३१ शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार संच खरेदी करून अनुदानाची मागणी केली. त्यांचे तीन कोटी ५५ लाख रुपयांचे अनुदान नुकतेच जमा झाले. परंतु २०२२-२३ या आर्थिक वर्षातील १९२६ शेतकऱ्यांचे चार कोटींचे अनुदान थकले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT