PM Kisan Yojna News Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Pm Kisan : एक लाख १६ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण

सांगली ः जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ लाभार्थी असून ३ लाख २०० हजार ४३१ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, तर १ लाख १६ हजार २१४ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे (PM Kisan Scheme) ४ लाख ३६ हजार ६४५ लाभार्थी असून ३ लाख २०० हजार ४३१ लाभार्थ्यांची ई-केवायसी (PM Kisan E-KYC) पूर्ण झाली आहे, तर १ लाख १६ हजार २१४ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. प्रलंबित लाभार्थ्यांची यादी sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून ई-केवायसी प्रलंबित असलेल्यांनी ती तत्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पीएम किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. पीएम किसान योजनेचे वर्षासाठी २ हजार रुपयांचे तीन हप्ते असे एकूण वार्षिक ६ हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहेत आणि ते हप्ते पुढे चालू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना स्वत: प्रधानमंत्री किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वैयक्तिकरित्या ई-केवायसी प्रक्रिया ‘ओटीपी’द्वारा पूर्ण करता येते किंवा संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा ‘आपले सरकार’ केंद्रावर ई-केवायसी करता येईल. ई-केवायसी पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरित होणार नाही, असे केंद्र सरकारकडून कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी

अ.क्र. तालुका एकूण लाभार्थी ई-केवायसी पूर्ण ई-केवायसी अपूर्ण

१. आटपाडी ३१८०१ २१८५० ९९५१

२. जत ७४३७३ ५७५२६ १६८४७

३. कडेगाव ३६८७१ २७५१६ ९३५५

४. कवठेमहांकाळ ३०६४४ २३६९९ ६९४५

५. खानापूर २७३३१ १७७१६ ९६१५

६. मिरज ५८४१८ ३९४४७ १८९७१

७. पलूस २५४३२ १९३६२ ६०७०

८. शिराळा ३७६०६ २८५८३ ९०२३

९. तासगाव ४४२२८ ३२६८६ ११५४२

१०. वाळवा ६९९४१ ५२०४६ १७८९५

एकूण ४,३६,६४५ ३,२०,४३१ १,१६,२१४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT