PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Pm Kisan : धुळे जिल्ह्यात ९३ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी

या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई- केवायसी करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसीसाठी शासनाकडून ‘ओटीपी’ किंवा ‘बायोमेट्रिक’, असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

धुळे ः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (Kisan Sanman Nidhi Yojana) लाभासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई- केवायसी (PM Kisam e-KYC) करणे बंधनकारक आहे, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. धुळे जिल्ह्यात योजनेच्या एकूण लाभार्थींपैकी ९३ हजार ७७३ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे.

या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई- केवायसी करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसीसाठी शासनाकडून ‘ओटीपी’ किंवा ‘बायोमेट्रिक’, असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे दरवर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातात.

धुळे जिल्ह्यातील एक लाख ८८ हजार ८१९ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ९३ हजार ७७३ लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ९५ हजार ४६ शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या योजनेअंतर्गत ११ हप्त्यांमध्ये प्रतिदोन हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. पुढील १२ व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा अनुदान मिळणार नाही. त्यामुळे उर्वरित सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जोशी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: २०२६–२७ अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घोषणा

Agricultural Machinery Subsidy: मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेसाठी अर्ज करा

SevaKarmi Plus: ‘सेवाकर्मी प्लस’ अभियानात ‘शबरी महामंडळ’ प्रथम

Rural Life: गोष्ट एका मायाळू जिवाची

Natural Farming Mission: नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ५४ शेतकरी गट स्थापन

SCROLL FOR NEXT