Farmer E-KYC Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : नगर जिल्ह्यात ८२ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण

तेरावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगर जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ५७९ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत.

Team Agrowon

Nagar News : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत (PM Kisan Scheme) जिल्ह्यातील ८२ हजार ५६८ पात्र लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी (PM Kisan E KYC) नोंदणी केली नाही. जिल्हा प्रशासनाने वारंवार जनजागृती करून देखील लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

ई-केवायसी प्रलंबित राहण्याची संख्याही राज्यात सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. दरम्यान, या योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत १२ हप्त्यात एकूण १५८ कोटी ९३ लाख ४० हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे.

तेरावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगर जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ५७९ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत.

त्यापैकी ५ लाख २ हजार ८८७ लाभार्थ्यांनी ई-केवायसीची नोंदणी केली आहे. तर ८२ हजार ५६८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार जोडणी केलेली नाही.

यात नगर तालुक्यातील ५ हजार ३४२, नेवासे तालुक्यातील ५ हजार ६०८, श्रीगोंदे तालुक्यातील ७ हजार ९६६, पारनेर तालुक्यातील ७ हजार ४५०, पाथर्डी तालुक्यातील ८ हजार ४४५, शेवगाव तालुक्यातील ६ हजार ६८५, संगमनेर तालुक्यात ७ हजार ५६, अकोले तालुक्यातील ४ हजार ९२७, श्रीरामपूर तालुक्यात २ हजार ८०१, राहुरी तालुक्यात ५ हजार २२५, कर्जत तालुक्यात ६ हजार १९९, जामखेड तालुक्यात ६ हजार ५४८, राहाता तालुक्यात २ हजार ८१८, कोपरगाव तालुक्यात ३ हजार ५२८ व इतर १ हजार ९७० असे एकूण ८२ हजार ५६८ पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT