Farmer Loan Waive Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Loan Waive Scheme : कर्जमुक्ती अंतर्गंत ३१ कोटींवर प्रोत्साहनपर अनुदान वितरण

या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब लागत आहे.

Team Agrowon

Parbhani News : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत (Mahatma Jotirao Phule Farmers Loan Waive Scheme) मंगळवार (ता. २१) पर्यंत परभणी जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानास (Farmer Incentive Scheme) पात्र ९ हजार ९७४ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३१ कोटी २५ लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.

या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब लागत आहे. नुकत्याच प्रसिद्ध तिसऱ्या यादीत परभणी जिल्ह्यातील २५३ पात्र लाभार्थींचा समावेश आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यत दिला जात आहे.

या तीन वर्षांपकी शेवटच्या वर्षात कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जात आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ५२२ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

आजवर विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या ३ याद्यांमध्ये एकूण ११ हजार ३२६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी १० हजार ९०७ कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण शेतकऱ्यांनी करून घेतले असून ४१६ खात्याचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे.

एकूण १६२ कर्जखात्याबाबत तक्रारी आहेत. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती मार्फत ९५ तक्रारीचे निराकरण करण्यात आले अजून २० तक्रारी प्रलंबित होत्या.

मंगळवार (ता. २१) पर्यंत ९ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ कोटी २५ लाख रुपये अनुदान जमा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT