Jalyukt Shiwar Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jalyukt Shiwar Scam : त्रयस्थ चौकशीची शिफारस माझीच

जलयुक्त शिवार अभियानातील घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यालाच चौकशी समितीचा प्रमुख बनवले, असे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये सोमवारी (ता. ३) प्रसिद्ध झाले होते.

टीम ॲग्रोवन

पुणे : सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान योजनेतील (Jalyukt Shiwar Scam) गैरव्यवहाराच्या आरोपाबाबत कोणालाही पाठीशी घालण्याचा हेतू नाही; उलट त्रयस्थ चौकशीची (Jalyukt Shiwar Inquiry) शिफारस मी स्वतः केली होती, असा दावा कृषी आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांनी केला आहे.

जलयुक्त शिवार अभियानातील घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यालाच चौकशी समितीचा प्रमुख बनवले, असे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये सोमवारी (ता. ३) प्रसिद्ध झाले होते. तक्रारदार शेतकरी विलास यादव यांनी उपलोकायुक्तांकडे तत्कालीन संचालक नारायण शिसोदे व कोल्हापूरच्या कृषी सहसंचालकाबाबत तक्रार केली आहे.

त्यांनी सुनावणीत गंभीर स्वरूपाचे मुद्दे मांडले आहेत. ‘आयुक्तांनी दक्षता पथकाच्या अहवालानुसार घोटाळेबाजांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र सहसंचालकानेच गुन्हा दाखल केला नाही,’ असे यात नमूद केले आहे.

आयुक्त याबाबत म्हणाले, की शिसोदे स्वतः मृद्‍ व पाणलोट क्षेत्र विकास विभागाचे संचालक होते. तक्रारी आल्यानंतर त्यांच्या अखत्यारित कोल्हापूरच्या सहसंचालक व अन्य एका अधिकाऱ्यासह चौकशी समिती नेमली गेली. या समितीने दक्षता पथकाचा अहवाल तपासला. त्यातील बाबी विसंगत वाटल्या व तसा अहवाल लोकायुक्तांनाही सादर केला होता.

आयुक्तांनी तक्रारदार एकतर्फी माहिती देत असल्याचे सांगितले. ‘‘माझे कार्यालय या प्रकरणी काहीही करीत असले, तरी त्याबाबत तक्रारदार यादव समाधानी नसायचे. त्यामुळेच मी स्वतः लोकायुक्तांना त्रयस्थपणे चौकशी करावी व मला यातून बाजूला करावे, असे पत्राद्वारे लिहिले होते. श्री. यादव मात्र माध्यमातून चुकीची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे कृषी आयुक्त कार्यालयाची प्रतीमा बदनाम होते आहे,’’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT