Agriculture Drone Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Drone Subsidy : केंद्र सरकार देणार ड्रोन खरेदीसाठी अनुदान

केंद्र सरकार कृषी क्षेत्रासाठी ड्रोनवर अनुदान देण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कृषी ड्रोन अनुदान योजना देशात राबवली आहे. त्यानुसार ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते.

टीम ॲग्रोवन

केंद्र सरकार कृषी क्षेत्रासाठी ड्रोनवर अनुदान (Drone Subsidy) देण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कृषी ड्रोन अनुदान योजना (Drone Subsidy Scheme) देशात राबवली आहे. त्यानुसार ड्रोन खरेदीसाठी (Agriculture Drone) शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेतून शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान घेता येऊ शकते. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवरील विविध रोगांची तपासणी करता येणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. त्या घोषणेनुसार शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा सरकार करत आहे. त्यातून ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर सरकारकडून अनुदान दिले जात आहे.

किती अनुदान मिळणार ?

शेतकऱ्यांना या योजनेनुसार 50 टक्के आणि जास्तीत जास्त 5 लाख अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने पदवीधर तरुण, अनूसूचित जाती-जमाती, अल्प आणि सीमांत शेतकरी त्यासोबतच महिलांसाठी आणि देशातील पूर्वोत्तरी राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेनुसार ड्रोनच्या रक्कमच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपये अनुदान देण्यात येते.

अन्य कुणाला फायदा घेता येणार ?

तसेच शेतकऱ्यांनी 40 टक्के आणि जास्तीत जास्त 4 लाख रुपये ड्रोन खरेदीसाठी मदत सरकारकडून करण्यात येते. याशिवाय कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर या संस्थांना तसेच राज्य कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान मिळवता येते.

ड्रोनचा फायदा काय ?

ड्रॉनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी करता येतो. पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रॉनच्या मदतीने फवारणी करता येते. ड्रॉनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवरील किड रोगांचे माहिती ठेवता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT