Onion Subsidy
Onion Subsidy Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी अर्जांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Team Agrowon

Nashik News १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्ती धारकाकडे अथवा ‘नाफेड’च्या खरेदी (NAFED Procurement) केंद्रात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान (Onion Subsidy) देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत ३ ते २० एप्रिल होती.

मात्र हजारो शेतकरी अर्ज करणे बाकी असल्याने पणन संचालनालयाने अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबत पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांच्या स्वाक्षरीने पत्रक काढण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०२३ च्या सुरूवातीपासून लेट खरीप कांद्याच्या दरातील घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता 'कांदा बाजारभावतील घसरण व उपाययोजना'अंतर्गत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रतिक्विंटल व जास्तीतजास्त २०० क्विंटल प्रतिशेतकरी या प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

हे अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३ ते २० एप्रिल होती. मात्र अनेक शेतकरी कांदा अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचे बाकी राहिले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, बाजार समितीचे पदाधिकारी आदींकडून अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. पणन संचालनालयाच्या निदर्शनास ही बाब आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

‘वाढीव मुदतीची सूचना द्या’

मुदतवाढीबाबत ‘पणन’तर्फे याबाबत मुंबई वगळता जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांना पत्र लिहिण्यात आले आहे. वाढीव मुदतीबाबतची सूचना जिल्ह्यातील सर्व बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्ती धारक व नाफेड खरेदी केंद्रांना द्यावी, असे निंबाळकर यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT