PM Kisan Yojna News Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan Yojana : ‘किसान सन्मान’चा हप्ता पाहिजे असेल तर ‘केवायसी’ करणे आवश्यक

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना २ हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे प्रतिवर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे.

Team Agrowon

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून, त्यासाठी लाभार्थ्यांनी तत्काळ केवायसी प्रमाणीकरण (Pm Kisan E-KYC) करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना २ हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे प्रतिवर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे.

हा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आणि लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. या बाबी पूर्ण झाल्या तरच योजनेचे पुढील हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील.

ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवरील ‘फार्मर कॉर्नर’मधून किंवा सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

लाभार्थ्यांने ‘फार्मर कॉर्नर’मधून स्वत: ई-केवायसी करून घेतल्यास त्यास कोणतेही शुल्क राहणार नाही. सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्यासाठी प्रति लाभार्थी १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येईल.

लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून डीबीटी सुविधा प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे उपआयुक्त (कृषी गणना) तथा पीएम किसान पथक प्रमुख गणेश घोरपडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT