Animal Husbandry Department  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Animal Husbandry Scheme : ‘पशुसंवर्धन’च्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागामार्फत २०२२-२३ या वर्षासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाइन पद्धतीने ११ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत.

टीम ॲग्रोवन

नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत (Animal Husbandry Department) २०२२-२३ या वर्षासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत (Animal Husbandry Scheme) वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाइन पद्धतीने ११ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, १ हजार कुक्कुट मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप करणे तसेच २५+३ तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल.

जिल्हास्तरीय योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली असून लाभार्थ्यांने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षांपर्यंत लागू राहील. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालनापैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे ती निवड करण्याची सुविधा, अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com संकेतस्थळावर तसेच अँड्रॉइड मोबाइलवर AH-MAHABMS गुगल प्ले-स्टोअरवर ११ जानेवारी २०२३ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाइल क्रमांकात बदल करू नये.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार ), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT