Farm Mechanization Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farm Mechanization : कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अवजारांसाठी अर्ज मागवले

वाशीम जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोनप्रमाणे लक्षांक प्राप्त झाले आहेत. यासाठी शेतकरी, उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे स्वयंसाह्यता गट, शेतकरी उत्पादक गट आणि कृषी विज्ञान केंद्राकडून कागदपत्रांसह विहित नमुन्यांत अर्ज मागविण्यात आले आहेत.

टीम ॲग्रोवन

वाशीम : हा जिल्हा आकांक्षित असून, सन २०२२-२३ या वर्षात कृषी यांत्रिकीकरण (Farm Mechanization) उपअभियान व कृषी कल्याण अभियानांतर्गत सर्व तालुक्यातील निवडक गावांमध्ये कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी भाडेतत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवासुविधेसाठी तसेच बॅंक स्थापन करण्यासाठी कृषी अवजारे (Farm Implements) खरेदीसाठी मूळ किमतीच्या बॅंकेमार्फत ८० टक्के किंवा जास्तीत जास्त ८ लाख रुपये अनुदानावर राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

याबाबत संबंधितांनी १५ जानेवारी २०२३ पूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोनप्रमाणे लक्षांक प्राप्त झाले आहेत. यासाठी शेतकरी, उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे स्वयंसाह्यता गट, शेतकरी उत्पादक गट आणि कृषी विज्ञान केंद्राकडून कागदपत्रांसह विहित नमुन्यांत अर्ज मागविण्यात आले आहेत. याचे अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र/अवजारे संचाचे दरपत्रक व परीक्षण पुरावा, आधार कार्ड संलग्न बॅंक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत, संस्थेशी संबंधित व्यक्तीच्या बॅंक खात्यातून अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृ‍त केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र व संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड व फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत आणि विहित नमुन्यातील अर्ज जोडणे आवश्यक आहे. निवड झालेल्या गावांच्या अधिक माहितीसाठी प्रत्येक तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

लाभ न दिलेल्या गावांना प्राधान्य

निवडक गावातून ट्रॅक्ट्ररची संख्या कमी प्रमाणात असलेली गावे, अल्पशः व अत्यल्प जमीनधारकांचे अधिक प्रमाण, कृषी उत्पादकता वाढीस वाव असलेली गावे, केंद्र शासनाद्वारे निवडलेल्या गावांपैकी यापूर्वी न निवडलेल्या अथवा लाभ न दिलेल्या गावांना प्रथम प्राधान्य, अर्ज प्राप्त झाल्यानंतर लक्षांकानुसार पात्र अर्जामधून सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड उपविभागीय कृषी अधिकारी करतील. याबाबत १५ जानेवारीपूर्वी दुपारी ५ वाजेपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपूर्ण कागदपत्रांसह सादर करावे लागतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT