Agriculture Mechanization Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Mechanization Subsidy : कृषी यांत्रिकीकरणचे अनुदान रखडले

Mechanization Subsidy : कृषी खात्याच्या यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ३७६ ट्रॅक्टरसह अन्य साहित्याचे अनुदान शासनाकडून प्राप्त न झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

Team Agrowon

Solapur News : कृषी खात्याच्या यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ३७६ ट्रॅक्टरसह अन्य साहित्याचे अनुदान शासनाकडून प्राप्त न झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

शेतकऱ्यांना शेती क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी व यांत्रिकीकरणाला जोड द्यावी या उद्देशाने या अभियानांतर्गत ट्रॅक्टर, कडबा कटर, हार्वेस्टर, मळणी मशिन, नांगर, रोटावेटर आदी साहित्यासाठी अनुदान देण्यात येते.

त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या संकेतस्थळावर स्वतंत्र ऑनलाइन अर्ज करावा लागतो. निवड झालेल्या लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर साहित्याच्या खरेदीसाठी पूर्वसंमती दिली जाते व त्यानंतर संबंधित साहित्य व खरेदी केल्याची पावती तसेच त्याबाबत आवश्यक असणारी कागदपत्रे कृषी खात्याकडे सादर केल्यानंतर त्याचे अनुदान बँक खात्यावर दिले जाते.

परंतु गेले तीन महिने याबाबतचे अनुदान अद्याप जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली. यामध्ये सर्वाधिक अनुदान हे ट्रॅक्टरसाठी असून जवळपास ३७६ शेतकऱ्यांचे अनुदान रखडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उशिरा मिळणारे अनुदान हे बँकेचे कर्ज काढून घेतलेल्या साहित्याच्या व्याजापोटी जमा करावे लागणार आहे.

त्यामुळे मिळणारे अनुदान हे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी उपयोगी पडण्याऐवजी फायनान्स कंपनी व बँकेच्या व्याजाच्या भरतीसाठी उपयोगी पडणार आहे.

या अभियानांतर्गत खरेदी केलेल्या साहित्याचे अनुदान तत्काळ दिले तर शेतकऱ्यांना ते पैसे कर्जरूपाने घेतलेल्या साहित्यापोटी तत्काळ जमा करणे सोयीचे होते व साहित्याचा योग्य विनियोग होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते. मात्र, अशा पद्धतीने अनुदान रोखल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यापेक्षा तोटा अधिक होत आहे.

दोन-तीन महिने न आलेले अनुदान सध्या जिल्हा स्तरावर प्राप्त झाले आहे. दोन-चार दिवसांत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल.
गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी, मंगळवेढा
खरीप पेरणीपूर्व हंगामासाठी घेतलेल्या बैठकीतून या योजनेचे अनुदान आले आहे. त्यामुळे लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
समाधान आवताडे, आमदार, पंढरपूर-मंगळवेढा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT